Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीQR Code : QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?

QR Code : QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?

Subscribe

हल्ली बरेचजण कॅश पेमेंट करण्याऐवजी ऑनलाइन पेमेंटला अधिक प्राधान्य देतात. कारण ऑनलाइन पेमेंट करणे अधिक सोयीस्कर असते. यासाठी तुम्हाला खिशात कॅश घेऊन फिरावी लागत नाही.  QR कोड स्कॅन करुन एखाद्याला सहजपणे पैसे पाठवता येतात. अगदी छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी QR कोडचा वापर केला जातो. पण, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी QR कोड वापरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवे. या ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून अनेक फसवणूकीच्या घटना घडत असल्याचे आपण पाहतो. अशावेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी QR कोड वापरताना काय खबरदारी घ्यावी जाणून घेऊयात,

QR कोडची पडताळणी – 

  • खरं तर, QR कोड खरा की बनावट हे ओळखणे कठीण आहे. बनावट QR कोड हे खऱ्या कोडसारखे दिसतात. पण, तुम्ही पेमेंट करताना काही गोष्टी व्यवस्थित पाहिल्यास होणारी फसवणूक टाळता येईल.
  • तुम्ही ज्या व्यक्तीला QR कोड स्कॅन करुन पैसे पाठवणार आहात, त्यांचे नाव एकदा पडताळून पाहावे.
  • QR कोड स्कॅन केल्यावर स्क्रिनवर व्यक्तींचे नाव दिसते, ते चेक करावे. या टिप्समुळे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्यांनाच ते ट्रान्सफर होतील. जर नाव चुकीच्या व्यक्तीचे दिसत असेल तर पैसे ट्रान्सफर करणे टाळा.

  • बनावट QR कोड पेमेंट टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये साउंड बॉक्स वापरू शकता. जेणेकरुर कोणी बनावट QR कोडवर पेमेंट केलेले लक्षात येईल.
  • QR कोडबद्दल शंका निर्माण झाली असेल तर गुगल लेन्सने QR कोड स्कॅन करुन पाहावा. ही युक्ती तुम्ही खरा आणि बनावट QR कोड ओळखण्यासाठी करू शकता.
  • पैसे घेण्यासाठी किंवा देण्यासाठी QR कोडचा वापर करणे टाळणे फायद्याचे ठरेल, विशेष करुन जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल. अशा वेळी तुम्ही बॅक ट्रान्सफर करू शकता. बॅक ट्रान्सफरमुळे तुमचे पैसे सु्रक्षित राहतील आणि फसवणूक होणार नाही.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini