Friday, March 21, 2025
HomeमानिनीHoli 2025 : असली की नकली रंग कसा ओळखाल ?

Holi 2025 : असली की नकली रंग कसा ओळखाल ?

Subscribe

होळीचा सण काही दिवसांवर आला आहे. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रत्येकजण होळीच्या रंगात रंगलेला दिसतो. बाजारपेठा रंगीबेरंगी रंगानी सजलेल्या दिसतात. पण, अनेकदा आपल्याकडून होळीचे रंग खरेदी करताना चुका होतात. ज्यामुळे आपण नकली रंग खरेदी करतो आणि याच रंगानी होळी खेळतो. बाजारात मिळणाऱ्या या होळीच्या कुत्रिम रंगामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीरावरील रंग निघत नाही, केसांमध्ये रंग जमा होतो, जे काढणं मोठं मुश्किलचं काम असते. अशा परिस्थितीत रंग खरेदी करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात रंग असली की नकली कसा ओळखायचा.

गडद रंग खरेदी करू नये –

उजळ आणि गडद रंग बहुतेकदा बनावट असतात. यात काचेची पावडर, बारीक वाळू, पारा सल्फाइड यामुळे रंग आकर्षक वाटतात आणि आपण ते खरेदी करतो. पण, हे रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे गडद रंग खरेदी करणे टाळावेत.

रंगांना स्पर्श करावा –

जर रंग हाताला कोरडा वाटत असेल तर त्यात सिथेंटिक केमिकल असू शकतात. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, जेव्हा आपण नैसर्गिक रंगाची खरेदी करतो तेव्हा त्यात कोणतीही भेसळ नसते, अशा रंगाचा स्पर्श हाताला वेगळाच लागतो. ते तेलकट तर नसताच शिवाय कोरडेही लागत नाही.

रंगाचा गंध ओळखावा –

खरा किंवा बनावट रंग ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही त्याचा वास घेऊ शकता. यासाठी थोडासा रंग तुमच्या तळहातावर घ्या आणि त्याचा वास घ्या. जर तुम्ही खरेदी केलेल्या रंगामधून पेट्रोल, मोबिल ऑइल, केरोसिन तेल, केमिकल यासांरख्या सुगंधी गोष्टींचा सुवास येत असेल तर हे रंग बनावट आहेत, हे समजून घ्यावे.

ही पद्धत वापरता येते –

असली आणि नकली रंगातील फरक समजून घेण्यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात रंग मिक्स करा. जर पाण्यात रंग पूर्णपणे विरघळला तर समजून घ्यावे की, ते नकली रंग नाहीत. पण याउलट पाण्यात रंग विरघळण्यास वेळ लागत असेल तर ते नकली रंग नक्कीच असू शकतात.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini