उन्हाळा म्हणजे मँगो सिजन आणि मँगो हा सगळ्यांचं आवडतं फळ. आंबा तर नुसताच खायला सगळ्यांना आवडतो. पण आंब्याच्या अनेक व्हरायटी उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळी फळे नक्की खावी जेणेकरून शरीराला उत्तम पोषण मिळते.
फळांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. यात उन्हाळ्यात फळांचा राजा असलेला आंबा खायला सर्वांनाच आवडतं. त्यामुळे मनसोक्त आंबा फळ नक्की खा आणि त्याच्या अनेक पदार्थांचा आस्वाद घ्या.
- Advertisement -
साहित्य-
- दोन मोठे आंबे
- चार स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम
- काजूचे चार तुकडे
- एक कप दूध
- दोन टेबलस्पून साखर
- बदामचे चार तुकडे

कृती-
- सर्वप्रथम आंबा नीट सोलून घ्या.
- आंबा सोलून त्याचा लगद्याचे लहान तुकडे करा.
- उरलेला लगदा एका भांड्यात काढा.
- सर्वकाही एकत्र मिसळा नंतर आंब्याचा लगदा ब्लेंडरमध्ये टाका.
- त्यासोबत थंडगार दूध, साखर आणि व्हॅनिला आइस्क्रीमचे 2 स्कूप सोबत टाका.
- ग्लासमध्ये हे सगळे मिश्रण ओता. या मँगो मिल्कशेकवर आइस्क्रीमचा एक स्कूप घाला.
- यानंतर सगळ्यात शेवटी यावर कापलेले काजू, बदाम घाला आणि छान सजवा.
- थंडगार मिल्कशेक आता सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :