झटपट तयार करा भाकरीचा पिझ्झा

how to make bhakari pizza
झटपट तयार करा भाकरीचा पिझ्झा

पिझ्झा हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. सध्या सगळेच घरी असल्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारे पिझ्झा तयार करत आहे. त्यामुळे आज आपण भाकरीचा पिझ्झा कसा तयार करतात हे पाहणार आहोत.

साहित्य –

कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण क्रश, काळी मिरी, चीज, भाकरी, टोमॅटो सॉस, लाल मिरची पावडर, मीठ, साखर आणि तेल

कृती –

प्रथम गॅसवर पॅन ठेवून तो गरम झाल्यावर तेल ओतायचे. मग त्यात लसूण क्रश आणि मिरची कापून घालायची. मग ते चांगले परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये काळी मिरी घालायची. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतवून घ्यायचा. मग त्यात टोमॅटो घालायचा आणि हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली मिरची घालायची. मग त्यात लाल मिरची पावडर, मीठ आणि साखर घालायची. सर्व मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर भाकरी घेऊन त्यावर काटेरी चमच्याचे होल पाडून घ्यावेत. मग भाकरीवर बटर लावायचे आणि त्यावर टोमॅटो सॉस टाकून तो भाकरीवर सर्वत्र पसरवायचा. त्यानंतर त्यावर चीज बारीक करून टाकावे आणि तयार केलेले मिश्रण सर्वत्र भाकरीवर पसरवून घ्यावे. मग पुन्हा त्यावर चीर बारीक करून टाकावे आणि पॅन गरम करून त्यामध्ये तयार केलेला भाकरीचा पिझ्झा ठेवावा आणि तो ४ ते ५ मिनिटे झाकण ठेवून तो नीट रॉस्ट करून घ्यावा.