घरताज्या घडामोडीहाय प्रोटीन्स कडधान्याचे सॅलेड

हाय प्रोटीन्स कडधान्याचे सॅलेड

Subscribe
कडधान्याच्या उसळी आपण नेहमीच खातो. पण याच कडधान्याचे सॅलेड ही बनवता येते. ज्या व्यक्ती जीम आणि नियमित व्यायाम करतात. त्यांच्या डाएटमध्ये कडधान्याचे सॅलेड हे असतेच. प्रोटीन्सने पुरेपुर असलेले हे सॅलेड सामान्य व्यक्तींसाठीही आरोग्यदायी आहे.
साहित्य 

अर्धी वाटी मोड आलेले मूग, अर्धी वाटी मोड आलेली मटकी, अर्धी वाटी  भिजवलेले काबूली चने, अर्धी वाटी भिजवलेले सोयाबीन बी. अर्धी वाटी डाळींबाचे दाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा. अर्धी वाटी बारीक चिरलेला टॉमेटो, एक चमचा लिंबाचा रस. चवीनुसार मीठ.

कृती

सर्वप्रथम सर्व कडधान्ये अर्धवट शिजवून घ्यावीत. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो,मीठ,डाळींबाचे दाणे आणि लिंबाचा रस पिळावा, सर्व मिश्रण एकजीव करावे. कडधान्याचे सॅलेड खाण्यास द्यावे.

- Advertisement -

हेही वाचा – हेल्थी Egg Noodles


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -