घरताज्या घडामोडीइम्युनिटी बूस्टर 'चिकन सूप' नक्की ट्राय करा

इम्युनिटी बूस्टर ‘चिकन सूप’ नक्की ट्राय करा

Subscribe

चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी चिकन सूप पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी, खोकला झाल्यास चिकन सूप आवर्जून प्यावे. पावसाळ्याच्या थंडीत चिकन सूप पिल्याने शरीरास उर्जा मिळते. चिकन सूपमध्ये वापरण्यात येणारे मसाल्याचे पदार्थही आरोग्यवर्धक असल्याने आजारी व्यक्तीची प्रकृती लवकर ठणठणीत होते.

साहित्य

- Advertisement -

२०० ग्रॅम चिकन, (हाडाचे पीस घ्यावेत) , दोन तेजपानं, दोन चमचे अमूल बटर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर, अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात. अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक, पाव वाटी मक्याचे दाणे, दोन चमचे बारीक चिरलेल आलं लसून, दोन चमचे कॉर्नफल्ॉवर , एक अंड

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम एका फ्रायपॅन किंवा कुकरमध्ये अमूल बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता टाकावा. नंतर स्वच्छ धुतलेले चिकनचे पीस त्यात टाकावेत. परतून घ्यावेत. लालसर रंग आल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा एकदा चिकन परतावे. नंतर चिकन शिजेल एवढे पाणी टाकून तीन ते चार शिट्या घ्याव्यात. कुकर थंड झाल्यावर शिजलेले चिकनचे बारीक तुकडे करावेत. चिकन शिजवलेले पाणी एका पातेल्यात काढावे. गॅसवर पसरट पातेल्यात ठेवावे. त्यात ते पाणी घ्यावे. मग त्यात चिकन, बारीक चिरलेल्या सर्व भाज्या टाकाव्यात. उकळी आली की त्यात एक अंड फोडून टाकावे. नीट ढवळून घ्यावे. नंतर एक वाटीत दोन चमचे पाणी घेऊन त्यात कॉर्नफल्ॉवरची पातळ पेस्ट बनवावी. ती त्यात टाकावी. नंतर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकावे. अशा प्रकारे चिकन सूप तयार करावे.


हेही वाचा – दुधी भोपळ्याचे पराठे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -