Sunday, April 21, 2024
घरमानिनीमुलांना पुस्तकप्रेमी कसे बनवाल?

मुलांना पुस्तकप्रेमी कसे बनवाल?

Subscribe

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले ही मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये गुरफटली गेली आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचे मन इकडे तिकडे रमू लागलाय. प्रत्येक पालकाला असे वाटते की, मोबाईल सोडून मुलाने पुस्तके वाचावी. असे केल्याने त्याचा अधिक चांगला अभ्यास होऊ शकतो. पण, मुलांना पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी हे आजच्या युगातील प्रत्येक पालकासाठी आव्हानच आहे. पालकांची हीच अडचण लक्षात घेत आज आम्ही तुम्हाला मुलांना पुस्तकप्रेमी कसे बनवायचे यासंदर्भात काही टिप्स सांगणार आहोत.

मुलांसोबत तुम्हीही पुस्तके वाचा –

- Advertisement -

एका अहवालानुसार मुले आजूबाजूच्या वातावरणातून बरेच काही शिकत असतात. बरीच मुलं पालकांचे अनुकरण  करतात. त्यामुळे शक्य तितका वेळ पालकांनी मोबाईल कमी वापरला पाहिजे. त्याऐवजी पुस्तके वाचायला हवीत. तुम्ही असे केल्याने हळूहळू मुले तुमचे अनुकरण करू लागतील. त्यांनाही पुस्तकांची आवड निर्माण होईल.

खेळीमेळीत शिकवा –

- Advertisement -

जर तुमचे मुलं अभ्यास करण्यास टाळाटाळ करत असेल तर अशावेळी मुलांवर प्रेशर देऊ नका. कारण तुमच्या अशा वागण्याने मुले पुस्तकांपासून दूर जाऊ शकतात. तुम्ही त्यांचा अभ्यास घेताना खेळीमेळीचं वातावरण ठेवा. ज्याने त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण होईल. पुस्तके वाचताना मुलांना जी पद्धत आवडते त्याचा वापर करा.

वाचनाची वेळ ठरवा –

मुलांच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी दिनचर्या खूप महत्वाची आहे. अशा वेळी जर वाचनाची वेळ तुम्ही सेट केलीत तर मुलांना शिस्त लागेल. ठरविक वेळेनंतर खेळ, त्यानंतर पुन्हा वाचन असे टाईमटेबल बनवा. याचा तुम्हाला फायदा होईल.

मुलांच्या आवडीनुसार पुस्तके निवडा –

अभ्यासाव्यतिरिक्त तुमच्या मुलांनी इतरही पुस्तके वाचावी अशी तुमची इच्छा असेल तर मुलांच्या आवडीची पुस्तके आणा. त्यांच्यासाठी तुम्ही गोष्टी, गाणी अशी मजेशीर पुस्तके आणू शकता. अशाने ते स्वतःहूनच आवडीने पुस्तक वाचायला बसतील. याशिवाय जर पाठ्यपुस्तके वाचायला त्यांना अडचण येत असेल जास्तीत जास्त चित्र असणारे पुस्तके त्यांना तुम्ही देऊ शकता. निदान पुस्तकांमध्ये असणाऱ्या चित्रांमुळे मुले पुस्तके आवडीने वाचतील.

 

 

 


हेही वाचा : उद्धट मुलांबरोबर असं करा डील

- Advertisment -

Manini