Saturday, April 20, 2024
घरमानिनीउपवासाचा कुरकुरीत डोसा कसा करावा?

उपवासाचा कुरकुरीत डोसा कसा करावा?

Subscribe

नवरात्रीत अनेकजण 9 दिवसांचा उपवास करतात. या काळात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाचा डोसा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

- Advertisement -
  • 6 चमचे भगरीचे पीठ
  • 4 चमचे शिंगाड्याचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • 4-5 बारीक वाटलेल्या मिरच्या
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये भगरीचे पीठ आणि शिंगाड्याचे पीठ एकत्र करा.
  • त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी, हिरव्या मिरचीचे वाटण आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करा.
  • आता हे मिश्रण 1/2 तासांसाठी झाकून ठेवा.
  • आता ठराविक वेळेनंतर गॅसवर मंद आचेवर एक पॅन ठेवा त्यामध्ये तेल किंवा तूप टाका आणि डोश्याचे पीठ पसरवा.
  • दोन्ही बाजूने डोसे कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार डोसा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली

- Advertisment -

Manini