निळ्या रंगाची गोकर्णाची फूले दिसायला खूपच मनमोहक आणि सुंदर असतात. दिसताच क्षणी गोकर्णाची फुले आपले लक्ष वेधुन घेतात. काही ठिकाणी या फुलाला ‘अपराजिता’ या नावाने ओळखले जाते. आयुर्वेदानुसार, गोकर्णाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. गोकर्णाच्या वेलीवर वर्षभर फुले येतात. काहीही विशेष मेहनत न घेता गोकर्णाच्या फुलांचा वेल भरभर वाढतो. गोकर्णाची फुले केवळ बाल्कनीची शोभा वाढवत नाही तर आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर आहेत. या फुलांपासून चहा आणि काढे तयार केले जातात. गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा काढा प्यायल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होतात. त्यामुळे आरोग्यासाठी गोकर्णच्या फुलांचा वापर कसा करावा, हे सविस्तर लेखातून जाणून घेऊयात.
आरोग्यासाठी गोकर्णाचे फुल वरदान –
- शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी गोकर्णांची फुले गुणकारी मानली जाते.
- वजनवाढीची समस्या असेल तर सकाळी उठल्यावर गोकर्णांच्या फुलांचा चहा प्यावा. वजनकमी होण्यास मदत मिळते.
- जुनाट आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोकर्णाच्या फुलांचा वापर करता येतो.
- गोकर्णाच्या फुलांचा काढा नियमित प्यायल्यास हाडांची दुखणी कमी होतात.
- तुम्हाला सतत सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज सकाळी गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा.
- फार पूर्वीपासुन गोकर्णाच्या फुलांचा काढा शरीरातील सुज किंवा विष बाहेर काढण्यासाठी मदत होते.
- दृष्टी कमकुवत झाल्यास गोकर्णाच्या फुलांचा पाणी प्यावे.
- त्वचेच्या तक्रारी कमी करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचे पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
- गोकर्णात ऍटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. हे ऍटी-ऑक्सिडंट शरीरातील हानिकारक तत्वांना बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात.
- डायबिटीसच्या रुग्णांसाठी गोकर्णाच्या चहा वरदान मानण्यात आले आहे. या फुलांचा चहा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतो. ज्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहतो.
- एकाग्रता वाढण्यासाठी दररोज नियमितपणे गोकर्णाचे फूलांचे पाणी प्यावे.
- ताणतणावाच्या समस्येने त्रस्त असाल तर गोकर्णाचा काढा प्यावा.
गोकर्णाचा काढा असा करा तयार –
- गोकर्णाच्या फुलांचा काढा तयार करण्यासाठी एक कप पाण्यात 4 ते 5 गोकर्णाची ताजी फुले घ्यावीत.
- पाण्याला कडकडीत उकळी आल्यावर पाण्याचा रंग बदलण्यास सुरूवात होईल.
- गॅस बंद करावा आणि तयार पाणी गाळून तुम्ही पिऊ शकता.
हेही पाहा –