Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी हेल्थी Egg Noodles

हेल्थी Egg Noodles

Related Story

- Advertisement -

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं बोललं जात. पण त्यालाही तसंच कारण असून अंड्यात शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्सचे प्रमाण मुबलक असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याबरोबरच शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

पण दररोज नाश्त्याला ऑम्लेट आणि बॉईल अंड खाऊन मुलं कंटाळतात. अशावेळी नूडल्समध्ये अंड टाकून बनवल्यास वेगळी डिश तर तयार होतेच पण मुलंही आवडीने ही नूडल्स खातात.

- Advertisement -

साहित्य

दोन बाऊल बॉईल नूडल्स, दोन अंडी, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी मटर, अर्धी वाटी शिजवलेला फ्लॉवर, एक चमचा हळद, चवीनुसार मीठ, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे अमूल बटर, एक चमचा आलं लसून पेस्ट.

- Advertisement -

कृती

सर्वप्रथम एका कढईत बटर गरम करून घ्या. त्यात कांदा, मटर परतून घ्या. नंतर त्यात फल्ॉवर टाका.अंडी फोडून टाका. आलं लसून पेस्ट, हळद, मीठ टाकून परता. आता त्यात नूडल्स टाका. सर्व मिश्रण चांगले परतून घ्या. हेल्थी अंडा नूडल्स तयार.


हेही वाचा – इम्युनिटी बूस्टर ‘चिकन सूप’ नक्की ट्राय करा


 

- Advertisement -