Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीBeautyHomemade Cleanser : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लींजर

Homemade Cleanser : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लींजर

Subscribe

प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचे असते. यासाठी हलका फुलका मेकअप का होईना महिलांमडळीकडून केला जातो. मेकअप करण्यासाठी मेकअप टूल्सचा वापर करण्यात येतो. याच मेकअप टूलमधील एक मेकअप टूल म्हणजे मेकअप ब्रश. मेकअप ब्रशमुळे फ्लॉलेस मेकअप करणे सोपे जाते. त्यामुळे हमखास महिलामंडळी त्याचा वापर करतात. पण, वापर करण्यासोबत त्याची स्वच्छचा ठेवणे महत्वाची असते आणि तीच केली जात नाही. अस्वच्छ मेकअप ब्रशमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जाणून घेऊयात घरच्या घरी खिशाला कात्री न लावणारे ब्रश स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लींजर कसे बनवायचे.

बेकिंग सोडा आणि पाणी –

  • बेकिंग सोडा आणि गरम पाणी एकत्रित करुन तुम्ही होममेड क्लींजर तयार करू शकता.
  • यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी.
  • तयार पेस्ट ब्रशवर लावावी आणि हलक्या बोटांनी ब्रश चोळून स्वच्छ करावा.

ऑलिव्ह ऑइल –

  • मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी ऍटी-बॅक्टेरीयल साबण किंवा लिक्विड आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून घ्यावा.
  • या सर्वाची पेस्ट तयार करुन घ्यावी.
  • यानंतर ब्रश ओले करुन घ्यावेत आणि पेस्टने ब्रश स्वच्छ करुन घ्यावेत. यामुळे ब्रशमधील बॅक्टेरीया नष्ट होतील.

खोबरेल तेल आणि कोमट पाणी –

  • मेकअप जास्त रखरखीत झाले असतील तर खोबरेल तेल आणि कोमट पाण्याने ब्रश स्वच्छ करता येतील.
  • या उपायामुळे ब्रशवरील ऑइल निघून जाईल आणि ब्रश पुन्हा नव्यासारखा चमकू लागेल.

शॅम्पू आणि गरम पाणी –

  • ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला शॅम्पू आणि गरम पाण्याचा वापर करता येईल. अगदी स्वस्तातील हे होममेड क्लींजर होऊ शकते.
  • क्लींजर तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये शॅप्मू आणि गरम पाण्याचे लिक्वीड तयार करुन घ्यावे.
  • तयार पाण्यात ब्रश 10 मिनींटासाठी ठेवावेत.
  • या होममेड क्लींजरमुळे नक्कीच तुमचे मेकअप ब्रश स्वच्छ होऊ शकतात.

 

 

हेही पाहा –

Manini