Wednesday, January 15, 2025
Homeमानिनीपावसाळ्यासाठी होम मेड रुम फ्रेशनर

पावसाळ्यासाठी होम मेड रुम फ्रेशनर

Subscribe

अनेकदा घरात ओलसरपणा राहिला की घरात कुबट अशी दुर्गंधी येते. ही दुर्गंधी नको नकोसे करुन सोडते. विशेष म्हणजे ही समस्या खास करुन पावसाळ्यात जाणवते. कारण पावसाळ्यात बाहेरचे वातावरण दमट असते. तसेच बाहेर ओलावा असतो. घरात चांगला सुगंध आला तर प्रत्येकाचा मूड खूप प्रसन्न आणि फ्रेश राहतो. त्यासाठी आपण अनेक वेळा बाजारातून महागडे रूम फ्रेशनरही विकत घेतो. हे महाग असण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकतात. तुम्ही घरच्या घरी देखील अगदी सहजरित्या स्वस्तात मस्त असे सुगंधी रुम फ्रेशनर तयार करु शकता.

  • कापूरचा वापर करुन तुम्ही रुम फ्रेशनर वापर करु शकता. कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्यांची पूड करा आणि ती पावडर स्प्रे बाटलीत भरा. त्यात पाणी टाका.
  • फुलांचा वापर करु शकता. ज्या फुलांचा सुगंध आवडतो ती फुले उकळण्यासाठी ठेवा. हे पाणी 30 मिनिटे चांगले उकळले की त्या फुलांचा अर्क स्प्रे बॉटलमध्ये भरा.
  • तुम्ही आवश्यक सुगंधी तेल एक कप पाण्यात चांगले मिक्स करा. ते व्यवस्थित मिक्स झाले का ते तुम्ही तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा. या स्प्रेच्या सुगंधामुळे घरात सुंगध दरवळेल.
  • इसेंशियल ऑईलच्या मदतीने तुम्ही अतिशय सुगंधी आणि दीर्घकाळ टिकणारा रूम फ्रेशनर तयार करू शकता. गुलाब, लव्हेंडर, लेमन ग्रास, टी ट्री अशा अनेक सूदिंग फ्रेगरंसमध्ये ते सहज उपलब्ध असतात.
  • एक वाटी पाण्यात तीन ते चार चमचे व्हॅनिला इसेन्स आणि सात ते आठ थेंब लेमन इसेंशियल ऑइल मिक्स करा. ते चांगले मिसळून स्प्रे बॉटलच्या साहाय्याने संपूर्ण घरात स्प्रे करा.
  • लवंग आणि दालचिनी वापरुन रुम फ्रेशनर बनवणे अगदी सोप आहे. याकरता तुम्हाला दोन ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात लवंग आणि दालचिनी हे एक समान टाका आणि ते पाणी चांगले उकळवा. पाणी उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते स्प्रे बाटलीत भरा आणि त्याचा रुम फ्रेशनर म्हणून वापर करा.

हेही वाचा : Gardening Tips- पावसाळ्यात अशी घ्या झाडांची काळजी


Edited By : Nikita Shinde

Manini