घराला सुगंधित करण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर करण्यात येतो. रूम फ्रेशनरमुळे घर दिर्घकाळ फ्रेश राहते. बाजारात विविध फ्लेवर्समध्ये रूम फ्रेशनर मिळतात. पण, बाजारात मिळणारे रूम फ्रेशनर महाग असतात. अशावेळी तुम्ही घरात नैसर्गिक गोष्टींपासून रूम फ्रेशनर बनवू शकता. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि घराचा प्रत्येक कोपरा सुगंधित होईल. चला तर मग जाणून घेऊयात, घरातील गोष्टींपासून रूम फ्रेशनर कसे तयार करायचे.
कॉफी –
कॉफी रूम फ्रेशनर बनवण्यासाठी कॉफी बिन्स किंवा तुम्ही ग्राउंड कॉफी एका बाउलमध्ये घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घाला. तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि हवे तेव्हा तुम्ही ते वापरू शकता.
संत्रा –
संत्र्यापासून रूम फ्रेशनर बनवण्यासाठी संत्र्याचा रस, थोडे तेल आणि पाणी याचे मिश्रण तयार करुन घ्यावे. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. संत्र्याचे रूम फ्रेशनर घरात वापरल्याने घर सुगंधित तर होईलच शिवाय संत्र्यामुळे घरात ताजेपणा राहील.
गुलाब –
घराला सुगंधित करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळवून घ्याव्यात. तयार पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून घराच्या प्रत्येक भागात शिंपडा.
कापूर –
घरातल्या किचनमध्ये जास्त दुर्गंधी येते. किचनमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी कापरापासून रूम फ्रेशनर बनवू शकता. या रूम फ्रेशनरमुळे किचनचा वास दूर होईल.
बेकिंग सोडा आणि दालचिनी –
बेकिंग सोडा आणि दालचिनीचा रूम फ्रेशनर दिर्घकाळ घर सुगंधित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. हा रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा दालचिनी पावडर घ्या. तयार रूम फ्रेशनर सुगंधित तर असेलच शिवाय जंतूनाशकही असेल.
हेही पाहा –