Saturday, February 8, 2025
HomeमानिनीBeautyLemon Face Pack : तजेलदार त्वचेसाठी करावे लेमन फेशियल

Lemon Face Pack : तजेलदार त्वचेसाठी करावे लेमन फेशियल

Subscribe

लिंबू प्रत्येकाच्या घरात असतोच. लिंबू अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयुक्त ठरणारा लिंबू त्वचेसाठी फायदेशीर असतो. हल्ली प्रदुषणामुळे त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. यावर रामबाण उपाय म्हणून तुम्ही लिंबाचे फेशियल करू शकता. लिंबातील गुणधर्मामुळे त्वचेच्या तक्रारी कमी होऊन त्वचा मऊ, तजेलदार होते. चला तर मग जाणून घेऊयात, घरी स्वस्त मस्त लेमन फेशियल कसे करावे,

लिंबूच का?

लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड, ऍटीफंगल गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या दूर होतात.

फेशियल करण्याची पद्धत –

टोनर –

लिंबूचे फेशियल करण्यासाठी टोनरची गरज असते. लिंबूपासून बनवलेले टोनर चेहऱ्याची त्वचा उजळवते. चेहरा टोनरने स्वच्छ करून घ्यावा.

स्क्रबर –

टोनरनंतर चेहऱ्यावर स्क्रबर लावावे. स्क्रबर पुर्णत: ऑप्शनल आहे.

फेस पॅक –

लिंबाचा फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घ्या. या मिश्रणात एक चमचा मध, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करावी. तयार फेस पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांनंतर स्वच्छ धुवून घ्यावा.

मॉइश्चरायज –

फेशियल करताना फेस पॅक झाल्यावर चेहऱ्याला लिंबू आणि दह्याने मॉइश्चरायज करणे आवश्यक आहे. या मॉइश्चरायजरने त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

लेमन फेशियलचे फायदे – 

लेमन फेशियलमुळे त्वचेवरील डाग नाहीसे होतात.

या फेशियनमुळे त्वचा चमकदार होते.

लेमन फेशियलमुळे त्वचा निरोगी राहते.

सुरकुत्यांची समस्या असतील तर लेमन फेशियलमुळे कमी होण्यास मदत होते.

लेमन फेशियल करताना काय काळजी घ्याल –

  • लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये.
  • लेमन फेशियल करताना फक्त लिंबू वापरू नये. लिंबामध्ये सिरम किंवा क्रीम वापरायला हवी.
  • लिंबूमधील सायट्रिक ऍसिडमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. त्यामुळे संवेदनशील त्वचा असल्यास लेमन फेशियल करताना काळजी घ्यावी.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini