Thursday, April 18, 2024
घरमानिनीLemon Peels- घरी बनवा लिंबाच्या सालीचे लोणचं,पहा साहित्य आणि कृती

Lemon Peels- घरी बनवा लिंबाच्या सालीचे लोणचं,पहा साहित्य आणि कृती

Subscribe

लिंबाचे लोणचे पाचन तंत्र दुरुस्त करते.

लोणचं हा विषय खूप जवळचा आहे. भारतीय थाळीत लोणच्याचे स्थान हे ठरलेले असते. जेवणात लोणचे नसेल तर जेवणाची चव ही अपूर्ण राहाते. लोणच्याचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. लोणचे साधारणत: आपण उन्हाळ्यात बनवतो व त्याला वाळवून सुकवून व त्यात इतर मसाले घालून त्याला काही काळ मुरण्यास ठेवतो. लिंबूमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  लिंबाची साल टाकून न देता आपण तिचा वापर लोणचे बनवण्यासाठी करु शकतो.

Indian Lemon Pickle - Chef's Mandala

- Advertisement -

लिंबाचे लोणचे कसे पटकन बनवायचे हे जाणून घ्या-

साहित्य –

- Advertisement -
  • लिंबाची साल – १ वाटी
  • मीठ – १ चमचा
  • काळे मीठ – १ चमचा
  • लाल तिखट – २ चमचे / जिरं,मोहरी (चवीनुसार)
  • धनेपूड – १ चमचा / साखर-२ छोटे चमचे (तुरटपणा-कमी करण्यासाठी)
  • पाणी (Water) व तेल – आवश्यकतेनुसार /
  • स्वाद वाढवण्यासाठी- लवंग/दालचिनी टाकू शकता.

Indian-style salted lime pickle recipe : SBS Food

कृती –

  • सर्वप्रथम लिंबाची साल स्वच्छ करा.
  • यानंतर २ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा यामुळे लिंबाची साले मऊ होतील.
  • आता एका भांड्यात साले काढा आणि ओव्हनमध्ये ५ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा.
  • एका भांड्यात मीठ, काळे मीठ, लाल तिखट, धनेपूड इत्यादी सर्व मसाले टाकून चांगले मिसळा.
  • लिंबाच्या सालीचे २ अर्धे तुकडे करून त्यात मसाले टाका आणि वरून तेल (Oil) घालून चांगले मिक्स करा.
  • आता ही वाटी ४ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा आणि लिंबू बेक करण्यासाठी ठेऊन द्या.
  • आता ते बाहेर काढून काचेच्या बरणीत ठेवा.
  • तुमचे लिंबाच्या सालीचे लोणचे तयार आहे.

 

हेही वाचा :

Kairi Chutney: तिखट गोड कैरीची चटणी,जाणून घ्या साहित्य आणि कृती

- Advertisment -

Manini