Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी झटपट बनवा भेंडीची भजी

झटपट बनवा भेंडीची भजी

Related Story

- Advertisement -

आतापर्यंत आपण बटाट्याची, कांद्याची, पालकाची, मूगाची भजी खाल्ली असतील. पण आज आम्ही तुम्हाला भेंडीची भजी कशी बनवतात ते सांगणार आहोत. चवीला टेस्टी आणि दिसायला आकर्षक असणारी ही भजी कुरकरीत लागते. वरण भात किंवा आमटी भाताबरोबर ही भजी खाण्याचा वेगळाच आनंद आहे.

साहित्य

- Advertisement -

पाव किलो भेंडी, पाव वाटी बेसन, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, एक चमचा कॉन फ्लॉवर, चवीनुसार तिखट, मीठ. छोटा चमचा हिंग. तेल.

कृती

- Advertisement -

भेंडी धुवून आणि पुसून घ्या. उभी चिरा, चार भाग करा. पातेल्यात बेसन घ्या. भजीचे पीठासारखे भिजवून घ्या. त्यात भेंडीचे उभे काप टाका. गरम तेलात खमंग तळा.


हेही वाचा – झटपट करा केळी आणि सफरचंदाची स्मुदी


 

- Advertisement -