पालक खिचडी खा, फिट राहा

how to make palak khichdi
पालक खिचडी खा, फिट राहा

पालकची भाजी म्हणजे आरोग्यदायी घटकांचा खजिनाच. पालकमध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई मुबलक असते. त्याचबरोबर यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम,आयन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडही भरपूर असते. तसेच यात असलेले आयन शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढवते. यामुळे सध्याच्या महामारीच्या काळात पालक खाणे गरजेचे आहे.

पालकापासून अनेक पदार्थ बनवता येतात. आमटीपासून भाजी ते खिचडीपर्यंत. आज आपण याच पालकापासून पौष्टीक पालक दाल खिचडी कशी बनवायची ते बघूया.

साहित्य

 • १ कप चिरलेला पालक
 • १ बारीक कापलेला कांदा
 • २ बारीक चिरलेले टॉमेटो
 • अर्धा कप तांदूळ
 • १ कप मूग किंवा तूरीची डाळ
 • १ चमचा जिरे
 • १ चमचा मोहरी
 • १  चमचा धने पावडर
 • १ चमचा हळद
 • चवीपुरते मीठ,
 • चवीपुरते लाल मिरची पावडर
 • ५-६ कडीपत्याची पाने
 • १ चमचा तूप
 • ४  बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
 • १ चमचा आलं लसून पेस्ट
 • १ ग्लास पाणी

कृती

धुतलेला तांदूळ पाण्यात पंधरा मिनिटे भिजवा. नंतर डाळ पाण्यात दोन ते तीनवेळा धुवून घ्या. प्रेशर पॅनमध्ये तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी कडीपत्ता आणि आलं-लसून पेस्ट टाकून चांगल परतून घ्या. नंतर त्यात कांदा आणि टॉमेटो टाका. मग त्यात हळद, मिरच्या, लाल तिखट, धनेपावडर, मीठ टाका. चांगलं परतून एकजीव करून घ्या. नंतर त्यात डाळ आणि तांदूळ टाकून २ मिनिटं खरपूस परता. त्यात पालक टाका. प्रेशर पॅन घट्ट बंद करा. १० ते १२ मिनिटे मंद गॅसवर ठेवा. २ शिट्या झाल्यानंतर प्रेशर पॅन गॅसवरून खाली काढा. वाफ गेल्यावर गरमागरम पौष्टीक पालक दाल खिचडी सर्व्ह करा.


हेही वाचा – Immunity Boost: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्की ट्राय करा सुक्यामेव्याच्या वड्या