घरलाईफस्टाईलपनीर दहीवडे

पनीर दहीवडे

Subscribe

साहित्य

पनीर- 200 ग्रॅम
दही- 4 कप
बटाटे- 2 उकडलेले
हिरव्या मिरच्या – 1-2 बारीक कापलेल्या
आले – अर्धा इंच
हिरवी चटणी – एक कप
जिरे – दोन मोठे चमचे भाजलेले
लाल मिरची पावडर – लहान चमचा
मिरपूड – अर्धा चमचा
तेल – तळण्यासाठी
काळे मीठ – दोन चमचे
मीठ – चवीनुसार

कृती

* सर्वात अगोदर पनीर आणि बटाटे कुस्करुन घ्या आणि चांगल्या प्रकारे एकत्र करा.
* या मिश्रणामध्ये आले, हिरवी मिरची आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मळून घ्या.
* आता याचे गोल गोल वडे तयार करा.
* हे वडे तळण्यासाठी कढईत टाका.
* सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
* हे सर्व्ह करण्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे तीन-चार वडे प्लेटमध्ये घ्या.
* त्यावरून दही, काळे मीठ, भाजलेले जिरे, मिरपूड, लाल मिरची पावडर, गोड चटणी, हिरवी चटणी टाका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -