चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच ! असे म्हणत चहाचे शौकीन असणारे आपण पाहतोच. आता तर मस्त गुलाबी थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अशा वातावरणात हातात गरमा गरम चहा असेल तर स्वर्गसुखच असेल. फक्कड चहा हवा असल्यास त्यात आवर्जून आलं टाकण्यात येते. चहामध्ये आलं टाकल्यावर चहाची चव तर झक्कास होतेच शिवाय आल्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे थंडीच्या दिवसात आरोग्यही उत्तम राहते. पण, फक्कड चहा होण्यासाठी चहामध्ये नेमकं आलं कधी टाकावं, हा प्रश्न उरतोच. जाणून घेऊयात, या प्रश्नाचे उत्तर…
चहामध्ये आलं टाकण्याची पद्धत –
पहिली पद्धत –
- चहापावडर टाकण्यापूर्वी आले ठेचून किंवा किसून पाण्यात तुम्ही टाकायला हवे.
- यानंतर या पाण्याला उकळी येऊ द्या.
- जवळपास 2 ते 3 मिनिटे पाण्याला उकळी येऊ द्यावी.
दुसरी पद्धत –
- दुसऱ्या पद्धतीत चहापावडर सोबत तुम्ही पाण्यात आलं टाकू शकता.
- यानंतर पाण्याला 3 ते 5 मिनीटे उकळी आणावी.
- चहाला उकळी आल्यावर त्यात दुध टाकून थोडावेळासाठी भांड्यावर झाकण ठेवावे.
- या पद्धतीने तुमचा फक्कड चहा बनून तयार होईल.
हिवाळ्यात चहा पिणे शरीर उबदार ठेवण्यासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात चहाचे सेवनाने आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात.
डायबिटीस –
चहा प्यायल्याने डायबिटीस होण्याची शक्यता असते. चहामध्ये साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे जास्त साखर शरीरातील साखर वाढण्याचे कारण ठरते. त्यामुळे शक्य तितका चहा टाळायला हवा.
पोट खराब होणे –
रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असते. अनेकांना बेड टी पिण्याची सवय असते. पण, उपाशीपोटी चहा कधीच पिऊ नये. यामुळे पोट खराब होऊ शकते.
लठ्ठपणा –
चहाच्या सेवनाने लठ्ठपणा येतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये आणायचे असेल तर चहा प्रमाणातच प्या.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde