घरलाईफस्टाईलHoli Special Receipe 2023 : पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवाल?

Holi Special Receipe 2023 : पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवाल?

Subscribe

होळीच्या निमित्ताने सर्वच घरांमध्ये पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवली जाते. हे दोन पदार्थ बनविल्याशिवाय होळी हा सण साजरा होऊच शकत नाही. यासाठीच आज आमही आपल्याला पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची? याची कृती सांगणार आहोत. खाली लिहिल्याप्रमाणे आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी बनविल्यास ती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच आवडेल..

पुरणपोळी बनविण्याची पद्धत :
सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका पातेल्यात ५ कप पाणी उकळत ठेवावे. चणा डाळ १ कप घेतल्याने तिच्या ५ पट पाणी घ्यावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेली डाळ घालून मंद ते माध्यम आचेवर झाकण घालून शिजू द्यावी. पोळ्यांसाठी पीठ भिजविण्यासाठी मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी. हळदीने पोळ्यांना फार सुंदर रंग येतो. १ चमचा तेल घालून पिठात चांगले रगडून घ्यावे, जेणेकरून पोळ्या खुसखुशीत होतात. नंतर थोडे थोडे पाणी घालून पोळ्यांची कणिक चांगली तिंबून घ्यावी. फार जास्त मऊ किंवा घट्ट असे पीठ मळू नये. पीठ मळताना ३/४ कप पाणी वापरावे. पीठ जरासं मुलायम झाले कि त्याला २ चमचे तेलाचा हात लावून चांगले रगडून घ्यावे. नंतर हा पिठाचा गोळा १ तास झाकून मुरू द्यावा.

- Advertisement -

चण्याची डाळ मंद आचेवर अर्ध्या तास शिजविल्यानंतर डाळीचा दाणा हाताने दाबून बघावा. लगेच पिठुळ झाला तर समजावे की डाळ शिजली. डाळ चाळणीत काढून तिचे उरलेले पाणी म्हणजेच “कट” वेगळा बाजूला काढावा. या कटाचीच प्रसिद्ध आमटी बनते जिला येळवण्याची आमटी असेही म्हटले जाते.

पुरण शिजवण्यासाठी एका कढईत १ चमचा तूप घालून त्यात शिजलेली चण्याची डाळ (गरम असतानाच) घालावी आणि बरोबरच किसलेला गूळही घालावा. मंद ते माध्यम आचेवर गूळ पूर्ण विरघळू द्यावा. पुरण शिजेपर्यंत वेलची आणि जायफळ खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक पावडर करून घ्यावी. १५ मिनिटांत पुरण शिजत आले की त्यातील गुळाचा रस आटत येऊन डाळीत एकजीव होतो. पुरण शिजले कि नाही हे पाहण्यासाठी त्याच्या मधोमध कढईत एक चमचा उभा करून ठेवावा, जर तो चमचा नीट उभा राहिला तर समजावे की पुरण शिजले. या उप्पर पुरण शिजवू नये नाहीतर पुरण कोरडे पडून ते पिठात भरता येत नाही. या पुरणात तयार केलेली पावडर, केशर आणि सुंठ पावडर घालून नीट एकजीव करून घ्यावे. गॅसवरून उतरवून पुरण थंड होऊ द्यावे.
पुरण थंड झाले की ते मिक्सरमधून फिरवून बारीक वाटून घ्यावे. हे पुरण दगडाच्या वरवंट्यावर वाटल्यास त्याला वेगळी चव येते.

- Advertisement -

पोळ्या बनवण्यासाठी पीठ तासभर मुरू दिल्यानंतर त्या पीठाला परत एकदा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. जितके पीठ मुलायम तितक्या पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात. पीठाचे एकदीड इंच व्यासाचे गोळे बनवून घ्यावेत. मोदकासारखी पारी करून त्यात पिठाच्या गोळ्याच्या आकारापेक्षा थोडा जास्त पुरणाचा गोळा घेऊन दाबून भरत जावा. नीट बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटण्यास सुरुवात करावी.

शक्य झाल्यास तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. तवा मध्यम आचेवर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस गुलाबी करड्या रंगावर भाजून घ्यावी. या पोळ्या खुसखुशीत तर बनतातच परंतु ५-६ दिवस बाहेर ठेवून सुद्धा खराब होत नाहीत.

कटाची आमटी करण्याची पद्धत :
चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी. खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्यावे. खलबत्त्यात कुटून त्याची पूड करावी. चणाडाळ व्यवस्थित घोटून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळ फोडणीस घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.

आमटीला उकळी फुटली कि कुटलेला मसाला चमचाभर घालावा आणि गोडा मसाला घालावा. ढवळून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे. एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे. ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनीट मंद आचेवर उकळावी.

ही आमटी पुरणपोळी खाताना तोंडी लावणी म्हणून घेतात तसेच गरमागरम तूपभातावर हि आमटी अप्रतिम लागते. तसेच ही आमटी आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खाल्ली तर छान मुरते आणि अजून चविष्ट लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -