Friday, April 19, 2024
घरमानिनीFood Tips : सोप्या पद्धतीने बनवा तांदळाच्या शेवया व नारळाचा रस

Food Tips : सोप्या पद्धतीने बनवा तांदळाच्या शेवया व नारळाचा रस

Subscribe
पारंपरिक पदार्थांनपैकी एक महत्वाचा आणि अगदी सगळ्यांना आवडणारा हा गोड पदार्थ म्हणजे तांदळाच्या शेवया आणि नारळाचा रस. कोकण भागात या पदार्थाची जास्त रेलचेल असते. हा पदार्थ जास्त करून उन्हाळयात बनवला जातो.
तांदळाच्या शेवया शरीराला पोषक आहेत तसेच नारळाचे गोड पाणी आणि त्यातील स्तव हे शरीराला थंडावा देतात. यामुळेचा हा पदार्थ उन्हाळ्यात जास्त खाल्ला जातो. लुसलुशीत तांदळाच्या शेवया आणि नारळाचा गोड रस एकदा करून पाहाच. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या…
नारळाच्या दुधातील शेवया • शिरवळ्या Steamed Rice vermicelli/Idiappam,  tandalachya shevaya #स्वयंपाकघर - YouTube
तांदळाच्या शेवया बनवण्यासाठी साहित्य:
१) ४ वाटया तांदळाचे पीठ
२) मीठ चवीनुसार
३) पाणी (तांदळाच्या पिठाच्या प्रमाणानुसार )

नारळाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१) ओल खोबर २ वाटया
२) १ वाटी किसलेला गूळ
३) मीठ चवीनुसार
४) वेलची पूड

- Advertisement -
नारळाचा रस आणि तांदळाच्या शेवया ।।Malvani Shevaya Ani Naralacha Ras।। (Rice  Noodles/Idiyappam) - YouTube

शेवया बनवायची कृती:

  • तांदळाच्या पीठात मीठ व गरम पाणी घालून थोडे घट्ट मळून घ्यावे.
  • एका पातेल्यात जास्तचे पाणी गरम करत ठेवावे.
  • पाण्याला उकळी आली की पीठाचे लांबट गोळे करून त्यात सोडावे व १०-१५ मिनिटे उकडू दयावे.
  • गोळे शिजले की ते शिजून वर येतात.
  • हे गोळे गरमच शेवयाच्या सोऱ्यात(शेवयाच्या भांड्यात) घालून लगेचच शेवया पाडून घ्याव्यात.
नारळाचा रस बनवण्याची कृती:

 

 

- Advertisment -

Manini