घरताज्या घडामोडीउपवास स्पेशल रेसिपी: झटपट तयार करा साबुदाण्याचे थालीपीठ

उपवास स्पेशल रेसिपी: झटपट तयार करा साबुदाण्याचे थालीपीठ

Subscribe

उपवासासाठी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात असे पदार्थ खातो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. यामुळे उपवासाच्या दिवशी काही वेगळं बनवायचं असेल तर साबुदाणा थालीपीठ हे उत्तम ऑप्शन आहे. हे थालीपीठ बनवायला सोपं तर आहेच. पण कमी वेळेत तयार होते. यामुळे वेळही वाचतो.

साहित्य

- Advertisement -

दोन वाटी भिजवलेला मऊ साबुदाणा, दोन चमचे बारीक वाटलेली मिरची, दोन उकडलेले बटाटे, अर्धी वाटी शेगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ.

कृती

- Advertisement -

एका पसरट पातेल्यात किंवा ताटात साबुदाणा घ्यावा. त्यात कुस्करलेला बटाटा टाकावा, मीठ, जिरे, मिरची, शेंगदाण्याचे कूट टाकून मळून घ्यावे. नंतर पोळपाटावर एक प्लास्टिक पेपर टाकावा. त्यावर हलक्या हाताने साबुदाण्याचे थालीपीठ थापावे. थालीपीठावर दुसरा प्लास्टिक पेपर टाकून हलक्या हाताने तव्यावर टाकावे. तूप टाकून खरपूस भाजावे. दह्याबरोबर खाल्ल्यास टेस्टी लागते.


हेही वाचा – World Food Safety Day 2021: कोरोना काळात बाहेरचं खाणं असुरक्षित; शरीरावर होतायंत गंभीर परिणाम


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -