Receipe : चटपटीत पनीर टिक्का कसा बनवाल? जाणून घ्या साहित्य आणि कृती

पनीर पासून तयार केलेले पदार्थ तयार करण्याची आणि खाण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. अशावेळी तुम्ही पनीर टिक्का देखील नक्की ट्राय करू शकता.

आजकाल अनेकांना पनीर पासून तयार केलेले पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे वारंवार पनीर पासून तयार केलेले पदार्थ तयार करण्याची आणि खाण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. अशावेळी तुम्ही पनीर टिक्का देखील नक्की ट्राय करू शकता.

पनीर टिक्का तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

 • 250 ग्राम पनीर
 • 1 शिमला मिरची
 • 1 कांदा
 • 1/2 वाटी दही
 • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
 • 1 चमचा लाल मिरची पावडर
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1/4 चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

 • पनीर टिक्का तयार करण्यासाठी सर्वप्रथम मसाला तयार करा.
 • एका भांड्यामध्ये दही, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून एकजीव करा.
 • आता पनीर चे लहान तुकडे करा.
 • शिमला मिरची आणि कांद्याला बारीक चिरून घ्या.
 • आता या सर्व मिश्रणाला दह्यामध्ये मिक्स करा आणि अर्धा तासासाठी वेगळं ठेऊन द्या.
 • त्यानंतर आता एक पॅन मध्यम आचेवर ठेवा.
 • आता पनीरच्या तुकड्यांना टूथपिकच्या मदतीने पॅनमध्ये ठेवून भाजून घ्या. तसेच थोड्या-थोड्या वेळाने पनीर तुकडे पलटी करा.
 • जेव्हा पनीरचे तुकडे लालसर भाजतील तेव्हा ते प्लेटमध्ये काढून घ्या.

हेही वाचा :Receipe : घरच्या घरी ट्राय करा पिझ्झा पॉकेट