घरताज्या घडामोडीसंत्र्याच्या सालाची टेस्टी भाजी

संत्र्याच्या सालाची टेस्टी भाजी

Subscribe

संत्री खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण त्या सालीदेखील भाजी बनवता येते. आज आम्ही हीच रेसिपी सांगणार आहोत. संत्र्याच्या सालाची भाजी ही चवीला स्वादिष्ट असते. पण त्यातील हलक्या कडवट चवीमुळे वेगळी भाजी खाल्ल्याचा फिलही येतो. दक्षिण भारतात ही रेसिपी बनवली जाते.

साहित्य

- Advertisement -

अर्धी वाटी संत्र्याचे साल बारीक चिरलेले, १ मोठा चमचा चिंचेचा रस, २ चमचे गूळ, पाव चमचा रसम पावडर(बाजारात मिळते). चवीनुसार मीठ, २ चमचे तेल, १ छोटा चमचा मोहरी, १ चिमूट हळद, १ चिमूट हींग, कडीपत्ता

कृती

- Advertisement -

एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ताची फोडणी द्या. नंतर त्यात बारीक चिरलेले संत्रे टाका. सर्वमिश्रण चमच्यांने एकत्र करून घ्या. नंतर ३ ते ४ मिनिट मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात चिंचेचा रस टाका व इतर सामग्री टाकून गरजेनुसार थोड पाणी टाका. उकळी येईपर्यंत मिश्रण ढवळत राहा. साल शिजले की त्यावर रसम पावडर टाका, पुन्हा उकळी घ्या. चपाती किंवा भात नाहीतर पराठ्याबरोबर ही भाजी छान लागते.


हेही वाचा – स्पेशल चिकन धनिया मसाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -