भारतीयांच्या जेवणात भात असतोच. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. काहींना रात्रीच्या जेवणात फक्त वरण-भात किंवा काहींना दही-भात, भाजी भात खायला आवडतो. भातापासून वेगवेगळ्या डिशेस बनवल्या जातात. जसे की, विविध पुलाव, खिचडी आणि तवा पुलाव सुद्धा. चमचमीत तवा पुलाव अनेकजणांच्या आवडीचा असतो. पण, अनेक महिलांचा तवा पुलाव घरी बनवताना बेत फसतो. एकतर तांदूळ मोकळा न होता चिकटतो किंवा मऊ होत नाही. तुमच्याही बाबतीत असं होत का? मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तवा पुलाव मोकळा, मऊ आणि टेस्टी कसा बनवायचा यासंदर्भात काही टिप्स सांगणार आहोत.
तवा पुलाव बनवताना वापरा या टिप्स –
- काही महिलांना तवा पुलाव मोठ्या गॅस फ्लेमवर शिजवायची सवय असते. पण, असे चुकूनही करू नये. तवा पुलावचं नाही तर भाताचा कोणताही प्रकार बनवताना गॅस फ्लेम कमी ठेवावी.
- तवा पुलाव बनवण्यासाठी शिजल्यावर मोकळा होईल असा तांदूळ घ्यावा. भात जर गोळा होणारा असेल तर तवा पुलाव व्यवस्थित होतो.
- तवा पुलावला हिंग, जिऱ्याचा तडका देताना फोडणी वेगळी तयार करुन घ्यावी. यासाठी फोडणी पॅनमध्ये हिंग, जिरे, लाल मिरची टाकून फोडणी तयार करावी आणि तवा पुलावमध्ये तडक्यासाठी वापरावी.
- तवा पुलाव बनवताना सतत चमच्याने हलवू नये. तुम्ही जर चमच्याने सतत पुलाव ढवळत राहाल तर अशाने भाताचे दाणे तुटतात.
- पुलाव तयार झाल्यानंतरच कोथिंबीर टाकावी. जर तुम्ही तवा पुलाव शिजताना कोथिंबीर टाकली तर पुलावची चव बदलू शकते.
- पुलावची चव वाढण्यासाठी हिंग, जिऱ्यासोबत 3 ते 4 मेथीचे दाणे त्यात मिक्स करावेत. यामुळे पुलाव चवदार बनतो.
हेही पाहा –