घरताज्या घडामोडीखमंग कलिंगडाचे थालीपीठ नक्की ट्राय करा

खमंग कलिंगडाचे थालीपीठ नक्की ट्राय करा

Subscribe
आतापर्यंत आपण भाजणीचे थालीपीठ खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला कलिंगडाचे थालीपीठ कसे बनवतात, ते सांगणार आहोत. सध्या बाजारात कलिंगड उपलब्ध आहेत. थंड असल्याबरोबरच कलिंगडात पाण्याचे प्रमाणही खूप असते. यामुळे उन्हाळ्यात आपण कलिंगड आवडीने खातो. पण कलिंगड खाल्यानंतर त्याचा पांढरा रंगाचा जो भाग असतो तो आपण फेकून देतो. पण खरं तर त्याचाही वापर करून थालीपीठ बनवता येते.

साहित्य

दोन वाटी कलिंगडातील पांढऱ्या भागाचा किस, दोन वाटी थालीपीठ भाजणीचे पीठ, चवीनुसार तिखट, मीठ, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, एक चमचा हळद. एक चमचा कसूरी मेथी, एक चमचा ओवा, तूप.

- Advertisement -
कृती

सर्वप्रथम एका पसरट भांड्यात अथवा परातीत भाजणी पीठ घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ, आलं लसून पेस्ट, ओवा, मेथी टाकावी. नंतर कलिंगडाचा किस टाकून पीठ एकत्र मळून घ्या. त्यात पाणी टाकू नका. गरम तव्यावर तूप टाकून थालीपीठ खमंग भाजा. हिरवी चटणी किंवा दह्याबरोबर थालीपीठ खाण्यास द्यावे.


हेही वाचा – हाय प्रोटीन्स कडधान्याचे सॅलेड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -