घरताज्या घडामोडीतेल न वापरता बनवा 'टेस्टी फिश करी'

तेल न वापरता बनवा ‘टेस्टी फिश करी’

Subscribe

मच्छी करी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो लालभडक तरी असलेला मच्छीचा रसा आणि गरमागरम भात. सोबत फ्राय तुकडी. खव्ययांना एवढे मिळाले तरी पुरे. पण प्रत्येकेवळी एवढे तेलकट आणि तिखट खाणे तब्येतीसाठी बरे नाही. त्यातच काही जणांना तेलकट खाण्यास मनाई असते. यामुळे आवडत असूनही त्यांना मासे खाता येत नाही. अशा डाएट कॉन्शियस व्यक्तींसाठी आज आम्ही एक चमचा तेलही न वापरता मच्छी करी कशी बनवायची ते सांगणार आहोत. तब्येतीसाठी उत्तम असलेल्या या मच्छी करीत भरपूर प्रोटीन्स असतात. माश्यांमध्ये प्रोटीन्स आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यांची आपल्या शरीराला गरज असते. यामुळे डॉक्टरही मच्छी खाण्याचा सल्ला देतात. पण त्यात तेलाचा अतिवापर झाल्यास त्रास होऊ शकतो.

साहित्य

- Advertisement -

पापलेटचे (अथवा अन्य कोणत्याही माशाचे) तुकडे, १ कप खवलेला नारळ, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, दोन बारीक चिरेलेले कांदे, कडी पत्ता, २ हिरव्या मिरच्या कापलेल्या, एक कप बारीक चिरलेला टॉमेटो, दोन चिंचा, १ लिंबू. चवीनुसार मीठ

कृती

- Advertisement -

एक कप पाण्यात चिंच भिजवून ठेवा. नारळ, तिखट, धने पावडर, हळद, काळी मिरी पावडर मिक्सरमध्ये वाटून घ्या. चिंचेचा गर काढून वरील मसाल्यात टाका. पातेले गॅसवर ठेवावे. वरील सर्व मसाला व मीठ त्यात टाकावा. मिश्रण चांगले उकळून घ्यावे. त्यात पापलेटचे तुकडे व कडी पत्ता टाकावा. पाच ते सात मिनिट ही करी उकळू द्यावी. लिंब पिळावा. नंतर गॅस बंद करावा. विनातेलाची मच्छी करी तयार. गरमगरम भाताबरोबर खाण्यास द्यावी.


हेही वाचा – पुण्यातली खाऊगल्ली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -