अनेक जणांना त्यांची त्वचा निरोगी हवी असते. पण त्वचेवर रोज अतिनील किरणांचा मारा होत असतो. अनेक जण यासाठी खूप गोष्टी करत असतात पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही दिवसभर मोबाईल, टीव्ही लॅपटॉप समोर तासंतास बसता त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. या गोष्टीमधून निघणारी ब्लु किरणे त्वचेसाठी हानीकारक असतात.
काम करताना थकवा येणं ही वाजवी गोष्ट आहे. पण, लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम केलं की थकवा वेगळाच असतो. डावीकडे आणि उजवीकडे स्वाइप करताना डोळे थकायला लागतात आणि चेहरा निस्तेज होऊ लागतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिवसभर आपण स्क्रीनसमोर बसून केवळ मानसिक ताणतणावच नाही तर त्वचेलाही तणाव जाणवतो. अलीकडील झालेल्या एका संशोधनानुसार या गोष्टींमधून निघणारा निळा प्रकाश तुमच्या त्वचेवर प्रतिक्रिया निर्माण करू शकतो ज्यामुळे वृद्धत्व आणि हायपरपिग्मेंटेशनची चिन्हे होऊ शकतात.
निळा प्रकाश कसा हानी पोहोचवतो?
निळ्या प्रकाशामुळे आपल्या त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते आणि वयाचा परिणाम त्वचेवर लवकर दिसू लागतो. मेलास्मा, त्वचेचा रंग खराब होणे, पिगमेंटेशन, कोलेजन ब्रेकडाउन आणि सुरकुत्या दिसणे या त्वचेच्या काही समस्या आहेत ज्या निळ्या प्रकाशामुळे होऊ शकतात. सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळेही त्वचेला नुकसान होते.
निळ्या प्रकाशापासून सनस्क्रीन करेल बचाव
निळ्या प्रकाशामुळे होणारे त्वचेचे नुकसान दुरुस्त करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट उत्पादनांचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रकाश तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि तुम्हाला या त्वचेशी संबंधित समस्येपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक चांगला सनस्क्रीन शोधणे खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मिनरल सनस्क्रीन लावत असाल, ज्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड असते. तर ते अल्ट्रा व्हायोलेट किरणांना रोखते तसेच त्वचेचे निळ्या प्रकाशापासून काही प्रमाणात संरक्षण करते.
मुलांना जास्त वेळ मोबाईल देऊ नका
लहानपणापासून जर तुम्ही मुलांना लॅपटॉप आणि मोबाईलपासून दूर ठेवले तर त्याचा परिणाम त्वचेवर होणार नाही. यामुळे त्यांच्या त्वचेवर ही परिणाम होणार नाही आणि डोळेही खराब होणार नाही.
निळा प्रकाश कमी करण्याचे सोपे मार्ग
दर 15/20 मिनिटांनी लॅपटॉप आणि मोबाईलमधून ब्रेक घ्या. त्यापासून 20 फूट अंतरावर 20 सेकंद फोकस केल्याने डोळ्यांना तसेच त्वचेला विश्रांती मिळते. तसेच, झोपण्याच्या वेळी 3 तास आधी तुमचे डिव्हाइस बंद केल्याने तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. त्यामुळे निळ्या प्रकाशाचा स्लीप हार्मोन मेलाटोनिनच्या उत्सर्जनावर परिणाम होत नाही. लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रिनचा ब्राइटनेस कमी करून देखील हे करता येते.