Friday, April 19, 2024
घरमानिनीFood Tips : भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Food Tips : भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे. झटपट होणारी आणि चविलाही छान लागणारी ही भाजी आपण नेहमी करतो. कधी ही भाजी छान मोकळी होते तर कधी ती एकदम चिकट होते आणि ती खायला अजिबात नको वाटते.

भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे. झटपट होणारी आणि चविलाही छान लागणारी ही भाजी आपण नेहमी करतो. कधी ही भाजी छान मोकळी होते तर कधी ती एकदम चिकट होते आणि ती खायला अजिबात नको वाटते.

भेंडीची भाजी आपण कधी कांदा, दाण्याचा कूट आणि गोडा मसाला घालून, कधी नुसतीच मिरची आणि धणे-जीरेची पूड घालून तर कधी भरली भेंडी अशी वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. भेंडी आरोग्यासाठी चांगली असल्याने त्याचा आहारात जरुर समावेश करावा.

- Advertisement -

Bhindi Aloo Pyaz Masala Sabzi | bharatzkitchen

भेंडी निवडताना अशी घ्या काळजी-

- Advertisement -

भेंडी खरेदी करताना कधीहि भेंडीचे देठ तोडून पाहायचे. हे देठ एका प्रयत्नात लगेच तुटले तर ती भेंडी कोवळी आणि ताजी असते. पण हे देठ मऊ पडले असेल आणि ते लगेच तुटले नाही तर मात्र ही भेंडी जुनी आहे असे समजावे. अशा भेंडीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे भेंडी खरेदी करतानाच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

 भेंडीची भाजी बनवताना या टिप्स फॉलो करा-

  • भेंडीची भाजी करताना भेंडी स्वच्छ धुवून मग ती पुसून घ्या.
  • पुसल्यानंतर भाजी लगेच फोडणीला टाकण्याऐवजी काही वेळ तशीच ठेवावी.
  • त्यामुळे चिरलेल्या भेंडीला चांगली हवा लागते आणि ती मोकळी होण्यास मदत होते.
  • यानंतर भेंडीची भाजी करताना त्यामध्ये लिंबू, आमसूल असा आंबट असणारा घटक घालावा.
  • यामुळे भाजीला चिकटपणा न येता ती चांगली मोकळी होण्यास मदत होते.
  • आंबट पदार्थामुळे त्यात एकप्रकारची रासायनिक प्रक्रिया घडते आणि ही भाजी छान मोकळी सुटसुटीत होते.

हेही वाचा : 

Kitchen Tips : बटाट्याला मोड येण्यापासून वाचवा; ‘या’ ट्रिक्स करा फॉलो

- Advertisment -

Manini