आपण बऱ्याचदा होळी खेळताना कोणत्या प्रकारचा रंग वापरत आहाेत याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. हल्ली लोक नैसर्गिक रंगांनी होळी खेळतात, तर काही लोक होळी खेळताना रासायनिक रंगांचा वापर करतात. जर तुम्ही तुमच्या केसांना केमिकल रंगांपासून वाचवले नाही तर तुमचे केस खराब होऊ शकतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात केमिकल रंगापासून केस कसे वाचवू शकतो.
हेअर सिरमचा वापर करा
हेअर सीरम केसांना पोषण देण्यास मदत करते. केसांचे नुकसान टाळण्यास आणि त्यांची चमक टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. होळीच्या धोकादायक रंगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही हेअर सीरम वापरू शकता.जर तुम्ही हेअर सीरम वापरला तर केस कोरडे आणि खराब होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
तेल
तुमचे केस खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, केसांना तेल लावा. केसांना तेल लावल्याने एक थर तयार होईल जो केसांना नुकसान होण्यापासून रोखेल. होळी खेळण्यापूर्वी तुम्ही केसांना नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेल लावू शकता.
दही आणि लिंबू
आपल्या त्वचेला दही लावा आणि पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. तसेच लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि रंगाचे डाग हलके करण्यास मदत करतो. लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि त्वचेला लावा. संवेदनशील त्वचेवर लिंबाचा रस न वापरण्याची काळजी घ्या.
होळी खेळल्यानंतर हे काम करा
- होळी खेळल्यानंतर, तुम्ही तुमच्या केसांचा रंग ब्रशने किंवा पाण्याने काढू शकता.
- यानंतर केस शॅम्पूने धुवा. जर तुम्ही जास्त शॅम्पू वापरला तर तुमचे केस कोरडे होऊ शकतात.
- केसांना पूर्णपणे शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर लावा.
- केस धुण्यापूर्वी तुम्ही हेअर मास्क देखील वापरू शकता.
- केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवा, कारण गरम पाण्यामुळे केस कोरडे होऊ शकतात.
हेही वाचा : Beauty Tips : केसांसाठी लिंबू वापरणे याेग्य आहे का ?
Edited By : Prachi Manjrekar