Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर दीपोत्सव भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल ?

भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल ?

मिठाई जर भेसळयुक्त असेल तर त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवाळीत जर मिठाई घेण्यासाठी तुम्ही दुकानात जात असाल तर तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

Related Story

- Advertisement -

सणासुदीला घरी मिठाई आणली जाते. बऱ्याचदा मिठाई घेताना आपली फसवणूकही केली जाते. मिठाई जर भेसळयुक्त असेल तर त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवाळीत जर मिठाई घेण्यासाठी तुम्ही दुकानात जात असाल तर तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे अस्सल मिठाई कोणती आणि भेसळयुक्त मिठाई कोणती हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स कायम लक्षात ठेवा.

भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी काही टिप्स ?

  • अस्सल मिठाई या साजूक तुपात तयार केलेल्या असतात. त्यामुळे मिठाई खाल्यानंतरही तुपाचा वास आपल्या हाताला येतो. तुपाचा वास येत नसेल तर ती मिठाई भेसळयुक्त आहे असा समजा.
  • मिठाई तयार करताना खव्याचा वापर केला जातो. तो खवा चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा शुद्ध खवा हा मळल्यानंतर एकजीव होतो. जर खवा मळल्यानंतर त्याच्या गोळ्याला चीरा जात असेल तर तो खवा भेसळयुक्त आहे.
  • मिठाई ही एकसारख्या पद्धतीने तयार केली जाते. त्यामुळे मिठाईही खाल्यानंतर ती दाताला चिकटत नाही. मिठाई जर दातांना चिकटत असेल ती मिठाई भेसळयुक्त आहे.
  • मिठाई तयार करताना मिठाईचे तुकडे करा आणि ते एका भांड्यात टाकून फेटून घ्या. मिठाई जर फेटताना एकजीव न होता त्याचे तुकडे पडत असतील तर मिठाई शिळी आहे असे म्हणता येईल.
  • मिठाईसाठी जर तुम्हाला खवा घ्यायचा असेल किंवा इतर काही पदार्थासाठी खवा लागणार असेल तर बेकिंग खवा घेऊ शकता. हल्ली बेकिंग खवाही बाजारात उपलब्ध आहे. बेकिंग खव्यामुळे पदार्थाची चव वाढते. त्याचबरोबर बेकिंग खवा लवकर खराब होत नाही.
- Advertisement -

 

- Advertisement -