जानेवारी ते एप्रिल हा काळ मुलांचं टेन्शन वाढविणारा काळ असतो. कारण या महिन्यांपासून मुलांच्या परिक्षा सुरू होतात. त्यामुळे मुलांसोबत पालकांचीही परिक्षा असते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यातच काही मुलांची आकलन शक्ती खूप चांगली असते तर काहींना कितीही प्रयन्त केले तरी केलेले पाठांतर लक्षात राहात नाही. अशा पालकांसाठी मुलांचा अभ्यास घेणे मोठे कठीण काम असू शकते. खरं तर, परिक्षेच्या पिरीयडमध्ये मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सृदृढ असणे आवश्यक आहे. सृदृढ आरोग्यासाठी मुलांनी केवळ दिवसरात्र अभ्यासचं नाही हेल्दी पदार्थ खायला हवेत. मुलांनी योग्य आहार केल्याने त्यांची ऊर्जा आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात, परिक्षेच्या काळात मुलांनी काय खावे आणि काय खाणे टाळावे..
प्रोटिनयुक्त आहार महत्वाचा –
- परिक्षेच्या काळात मुलांना हलके, निरोगी आणि घरी बनवलेले पदार्थ खायला द्यावेत.
- मेंदू आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी प्रोटिन्स महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मेंदू आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मुलांच्या आहारात दूध, चीज, अंडी, हिरव्या भाज्या आणि धान्य अशा पदार्थांचा समावेश करावा.
- मेंदूला तीक्ष्ण करणारे पदार्थ बदाम, अक्रोड खायला द्यावेत.
- मासे, जवस यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमुळे बुद्धी तल्लख होते
- कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ देणे टाळा. या पदार्थांमुळे सुस्ती येते. त्यामुळे मुलांना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ परिक्षेच्या काळात देऊ नये.
- रिकाम्या पोटी परिक्षेला मुलांना पाठवू नये. रिकाम्या पोटी परिक्षेला गेल्याने मुलाच्या आरोग्यावर आणि कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
- मुलांना सकाळी नाश्त्यात ओट्स, फळे, सुकामेवा तुम्ही देऊ शकता. या पौष्टिक नाश्त्याने मुलांना ऊर्जा मिळेल आणि त्यांची एकाग्रता वाढेल.
- अनेक पालकांना मुलांच्या नाश्त्यात चिप्स, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स द्यायची सवय असते. पण, या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे असे पदार्थ मुलांना देऊ नयेत.
- मुलांच्या नाश्त्यात हरभरा, शेंगदाणे, घरी बनवलेला चिवडा, मखाना देऊ शकता.
- परिक्षेच्या काळात पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ यांसारखे जंक फूड देऊ नये. या पदार्थामुळे शरीर जड होते आणि मानसिक थकवा वाढतो.
- परिक्षेच्या काळात मुलांना हायड्रेट ठेवावे. शक्य तितके पाणी, नारळ पाणी, लिंबूपाणी, फळांचा रस देणं फायद्याचे ठरेल.
- जास्त गोड आणि कॅफिनयुक्त पदार्थ देऊ नयेत.
हेही पाहा –