दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. कधी कधी तर चोरांकडून झालेल्या हल्यांमुळे व्यक्ती जखमी देखील झाले आहेत. नुकतचं झालेलं उदाहरण पाहायचे झाल्यास चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला आपण पाहिला. यानंतर इतक्या मोठ्या अभिनेत्यांच्या घरात चोरी करण्यासाठी चोर शिरला तर सर्वसामान्यांच काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण, काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास तुम्हीही तुमचं घर सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, घराच्या सेफ्टीसाठी काही सोप्या टिप्स
- सर्वात महत्वाचे म्हणजे दरवाज्यावर पिंपहोल असणे आवश्यक आहे. पिंपहोल असल्यावर आपण त्यातून बाहेर कोण आले आहे, हे सहजपणे ओळखू शकतो.
- जास्त उंचीवर पिंपहोल ठेवू नये. कारण कधी कधी मुले घरात एकटीच असतात. त्यामुळे घरातली सर्व सदस्यांची उंची लक्षात घेत पिंपहोल बनवावा.
- याव्यतिरीक्त तुम्ही डबल डोअर सुद्धा लावू शकता.
- तुमचे बंगला असेल तर अशावेळी सुरक्षा अलार्म तुम्ही बसवून घ्यायला हवे. सुरक्षा अलार्ममुळे चोर किंवा अज्ञात व्यक्ती आल्याची माहिती लगेचच मिळते.
- तुम्ही घरात बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन बसवून घेऊ शकता. जर दोघेही पालक कामावर जाणारे असतील अशावेळी मुलांच्या आणि घराच्या सेफ्टीसाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन थोडं खर्चिक असेल पण उपयुक्त ठरेल.
- घरात इमरजेन्सी इक्झिट असणे आवश्यक आहे. कारण आप्लकालीन परिस्थितीत तुम्हाला बाहेर निघता येते.
- दर सहा महिन्यांनी इलेक्ट्रीसिटी स्वीच बोर्ड तपासून घ्यावेत. यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या समस्या उद्भवणार नाही.
- घरात पाळीव कुत्रा ठेवू शकता. कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही. कुत्र्यांना दुरवरूनच अज्ञात व्यक्तीचा आवाज येतो आणि सावध होतात. त्यामुळे घराच्या सेफ्टीसाठी कुत्रा पाळणे बेस्ट राहील आणि तुमच्यामुळे मुक्या प्राण्याला घरही मिळेल.
- रात्रीच्या वेळी तुम्ही घरातील खिडकीत किंवा बाल्कनीत दिवे लावू शकता. यामुळे घरात उजेडही राहील आणि चोर घरात अंधार नसल्याने घरात येणार नाही.
- घराच्या खिडक्यांच्या बिजागडी मजबूत आहेत का नाही हे चेक करावे.
- तुम्ही भिंतीवर काटेरी कुंपण लावू शकता. सोसायटी असेल तर कंपाउडवर तुम्ही काचेचे तुकडे लावू शकता, जेणेकरून चोराला प्रवेश करता येणार नाही.
हेही पाहा –