फाउंडेशन हा मेकअपचा महत्त्वाचा भाग आहे. जो त्वचेला समान आणि नैसर्गिक लूक देण्यास मदत करतो. या फाउंडेशनमुळे आपला लूक सुंदर परिपूर्ण दिसतो. जर आपण फाउंडेशनची योग्य निवड केली नाही तर आपला लूक खराब तर दिसेल तसेच आपली त्वचा देखील खराब होऊ शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात कोणत्या टिप्सने फाउंडेशनची निवड आपण करू शकतो.
त्वचेचा प्रकार ओळखा
तुमची त्वचा कोरडी किंवा तेलकट मिश्रित किंवा संवेदनशील असल्यास त्यानुसार मॅट, ड्यूई किंवा हायड्रेटिंग फॉर्म्युला निवडा. तुमच्या त्वचेनुसार फाउंडेशनची निवड करा.
योग्य शेड निवडा
फाउंडेशनचा योग्य शेड निवडा फाउंडेशनचा शेड हातावर नाही, तर गळ्याच्या जवळ टेस्ट करा. तो त्वचेत सहज मिसळला पाहिजे.
योग्य फॉर्म्युला निवडा
जर तुमची त्वचा ऑइली असेल तर मॅट फिनिश किंवा ऑइल-फ्री लिक्विड फाउंडेशनची निवड करा. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर हायड्रेटिंग, डेवी फिनिश किंवा क्रीम बेस्ड फाउंडेशन जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर सेमी-मॅट किंवा लाइटवेट लिक्विड फाउंडेशन.
कव्हरेज लक्षात घ्या
जर तुम्हाला नैसर्गिक लूक पाहिजे असेल तर तुम्ही BB किंवा CC क्रीम वापरू शकता. दैनंदिन वापरासाठी तुम्ही मध्यम कव्हरेज आणि पार्टी किंवा इव्हेंटसाठी हाय कव्हरेज
सीझननुसार फाउंडेशन बदला
तुम्ही सीझननुसार फाउंडेशनमध्ये बदल करू शकता. उन्हाळ्यात हलके, मॅट फिनिश आणि हिवाळ्यात मॉइश्चरायझिंग फाउंडेशन.
फाउंडेशन वापरण्याआधी ट्राय घ्या
फाउंडेशन वापरण्याआधी ट्राय घ्या पूर्ण दिवस घालवून पहा की फाउंडेशन ऑक्सिडाईज होते का. त्वचेला सूट होतंय का, ब्रेकआउट्स तर होत नाहीत ना,हे बघा.जर तुम्हाला नैसर्गिक लूक हवा असेल, तर टिंटेड मॉइश्चरायझर किंवा BB क्रीम देखील चांगला पर्याय ठरू शकतो
अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट फाउंडेशनची निवड करू शकता.
हेही वाचा : Weight Loss : वेट लॉसमध्ये डिटॉक्स वॉटर फायदेमंद
Edited By : Prachi Manjrekar