घरताज्या घडामोडीट्रेंडी, स्टायलिश चप्पल, शूजची निवड कशी कराल?

ट्रेंडी, स्टायलिश चप्पल, शूजची निवड कशी कराल?

Subscribe

कोरोना काळ असाल तरी सध्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सेल सुरू आहेत. वेगवेगळ्या स्टायलिश चपला, कपडे अनेक प्लॅटफॉर्मवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे ट्रेंडी, स्टायलिश चप्पल, शूजची निवड कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत.

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशनेबल लूकसाठी नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा अभिनेत्रीचे स्टायलिश आउटफिट सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. बॉलिवूड अभिनेत्री स्टायलिश कपड्यांसह स्टायलिश चप्पल देखील घालतात. जबरदस्त हिल्स, सँडल आणि ट्रेंडी हिल्सची निवड करण्यासाठी तुम्ही बॉलिवूडच्या अभिनेत्रींकडून इन्स्पिरेशन घेऊ शकता.

- Advertisement -

सनशाईन

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ब्राइट कलरच्या ड्रेससोबत ब्राइट कलरची हिल्स देखील घालू शकता. ब्राइट कलरची हिल्स खूप छान दिसतात. आलिया प्रमाणे तुम्ही निऑन कलरची हिल्स ट्राय करू शकता.

- Advertisement -

मेटॅलिक हिल्स (Metallic Heels)

पार्टीसाठी खास मुलींना मेटॅलिक हिल्सची गरज असते. अशा परिस्थिती तुम्ही मोनी रॉयची मेटॅलिक्स हिल्स ट्राय करू शकता. मेटॅलिक्स हिल्स ही कोणत्याही आउटफिटवर तुम्ही घालू शकता.

मिनिमल हिल्स (Minimal heels)

मिनिमल हिल्स आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. अभिनेत्रींपासून सामान्य मुली क्लासी लूकसाठी मिनिमल हिल्स जास्त रेफर करतात. प्रियांका चोप्रा बऱ्याचदा मिनिमल हिल्समध्ये दिसली आहे. ही हिल्स तुम्ही पार्टी आणि ऑफिस आउटफिटवर घालू शकता.

स्टायलिश हिल्स (Stylish heels)

करीन कपूरने घातलेल्या स्टायलिश हिल्स तुम्ही कोणत्याही वेस्टर्न आउटफिटवर घालू शकता. सिल्वर कलरची ही हाय हिल्स खूप सुंदर आहे. करीन कपूर अनेक वेळा स्टायलिश हिल्समध्ये दिसत असते. तुम्ही देखील करीना कपूरसारखी डिझाईन हिल्स फॉलो करू शकता.

ब्लॅक हिल्स (Black heels)

गेल्या काही काळापासून वन स्ट्रिप ब्लॅक हिल्स ट्रेंडमध्ये आहे. बी टाऊनच्या अभिनेत्री अशा सिंपल हिल्समध्ये अनेक वेळा दिसतात. अशा प्रकारची ब्लॅक हिल्स तुम्ही इंडियन आणि वेस्टर्न आउटफिटवर घालू शकता.

स्टायलिश शूज 

स्टायलिश शूजमध्ये अनेक वेळा बॉलिवूडच्या अभिनेत्री दिसत असतात. स्टायलिश शूज घालणे अनेक कम्फर्टेबल असते. तसेच तुम्ही कोणत्याही वेस्टर्न लूकवर स्टायलिश शूज ट्राय करू शकता.


हेही वाचा – सिल्कच्या साड्या अधिक टिकाव्यात यासाठी काय कराल?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -