रोजच्या जीवनात तेच तेच काम करून आपल्या सर्वाना कंटाळा येत असतो. अशातच नोकरी हा पर्याय कायमस्वरूपी आपल्याला साथ देईल कि नाही यावर आपण ठामपणे काही सांगू शकत नाही. तसेच आता आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर स्वःचा बिजनेस असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे ‘स्टार्टअप’ नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे.

- स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग असतात. यासाठी तुमची स्वतःची तयारी हवी.
- पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे.
- आपल्याकडे आता या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात झाली आहे.
- आजच्या नव्या युगात पारंपरिक रोजगारनिर्मितीबरोबरच नव्याने आकाराला येणाऱ्या उद्योगांनी रोजगारांची निर्मिती करावी.
- उद्योग सुरू करायचा म्हटल्यानंतर विविध प्रकारचे कर, भांडवलाची कमतरता आणि गुंतवणुकीतील अडथळे तरुणांच्या वाटेतील काटे बनू नयेत.
- यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळे युवकांनी याचा फायदा करून घ्यावा.
- तसेच आजच्या महागाईच्या जीवनशैलीत साईड इनकम म्हणून स्वःतचा बिजनेस चालू करायला हवा.
- कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो उद्योग निवडला आहे तो योग्य आहे का किंवा त्या उद्योगाची सध्याची गरज कोणती आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.
- मूळातच स्टार्टअप म्हणजे अशाप्रकारचा व्यवसाय की जो एका विशिष्ट कल्पनेवर आधारीत असतो.
- Advertisement -
- Advertisement -