Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationship'या' टिप्सने दूर करा Homesickness

‘या’ टिप्सने दूर करा Homesickness

Subscribe

जगभरात आपण किती ही फिरलो तरीही घरामध्ये जो आराम आणि शांतता मिळते ती कुठेच दुसरेकडे मिळत नाही. परंतु काही वेळेस असे होते की, अभ्यास किंवा कामासाठी घरापासून काही लोकांना दूर रहावे लागते. पण कालांतराने घरातल्यांची खुप आठवण येत राहते आणि ते स्वत:ला ऐकटे असल्याचे मानतात. अशातच होम सिकनेसची समस्या वाढते. परंतु यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही पुढील काही टीप्स जरुर वापरा.

-मित्र बनवा

- Advertisement -


घरापासून दूर राहत असाल तर अभ्यास आणि नोकरीसोबत नवे मित्र सुद्धा बनवा. कॉलेज किंवा ऑफिसमध्ये लोकांसोबत मिक्स होत त्यांच्याशी मैत्री ही करा. ऐवढेच नव्हे तर तुम्ही थोड अॅडजेस्ट करु शकत नसाल तर घराची आठवण आल्यानंतर अधिक वेळ मित्रांसोबत घालवा. जेणेकरुन तुम्हाला होम सिकनेसच्या समस्येपासून दूर रहाल.

-छंद जोपासा

- Advertisement -


प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. एखाद्याला जेवण बनवायला आवडत असेल तर दुसऱ्याला चित्र काढणे. असे काही छंद असतील ते तुम्ही जोपासले पाहिजेत. जेव्हा तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तेव्हा तुम्ही हे छंद नक्की जोपासा. यामुळे तुम्ही त्यात गुंतलेले ही रहाल.

-लोकांची मदत करा


एकटे रहात असाल तर घरच्यांची आठवण येणे सहाजिकच आहे. अशातच बहुतांश लोक तणाव आणि डिप्रेशनचे शिकार होतात. यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही घरातून थोडं बाहेर पडा. लोकांची मदत करा. यामुळे तुम्ही व्यस्त रहाल आणि तुम्हाला आनंदी ही वाटेल.

-स्वत:ला ओळखा


बहुतांश वेळा लोक परिवारासोबत राहत असल्याने त्यांना स्वत: आपण कसे आहोत हे ओळखता येत नाही. अशातच ऐकटेपणात तुम्ही स्वत:ला अधिक उत्तमपणे ओळखू शकता. जेव्हा तुम्हाला घरातल्या लोकांची आठवण येत असेल तेव्हा तुम्ही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- Motivational Tips- या 3 गोष्टीं तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत

- Advertisment -

Manini