महाशिवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत. शिवभक्तांसाठी हा एक महत्त्वाचा धार्मिक सण असतो. या दिवशी संपूर्ण देश शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसतो. वर्षभर शिवभक्त या सणाची आतुरतेने वाट पहातात. यंदा 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भक्तगण विविध मंदिरात शिवाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. महादेवाची मनोभावे पूजा करून शिवाला बेलपत्र अर्पण करतात. या दिवशी कोणी निर्जळी उपवास करते तर कोणी सात्विक आहार घेताता. पण, कधी कधी उपवास केल्याने आरोग्याच्या विविध समस्या जाणवतात. अशावेळी महाशिवरात्रीचा उपवास करताना काय काळजी घ्यावी, जाणून घेऊयात,
भरपूर पाणी प्यावे –
अनेकजणांना निर्जळी उपवास करण्याची सवय असते. पण, उपवासाच्या दिवशी दिवसभर पाणी न पिण्याची सवय असते, जी पूर्णपणे चुकीची आहे. उलट अशावेळी हायड्रेट राहणे महत्त्वाचे असते. उपवासाच्या दिवसभरात कमी कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला एनर्जी मिळेल आणि तुम्ही डिहायड्रेट राहाल.
सतत चहा पिऊ नये –
महाशिवरात्रीचा उपवास असो वा इतर कोणताही सण अनेकजणांना वारंवार चहा पिण्याची सवय असते. पण, उपवासाच्या दिवशी चुकूनही चहा पिऊ नये. उपवासाच्या दिवशी सतत चहा प्यायल्याने गॅस आणि ऍसिडीटीची समस्या उद्भवते. उपवासाच्या दिवशी केवळ एकदाच चहा प्यावा.
आहार महत्त्वाचा –
महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना आहाराकडे लक्ष द्यावे. तुम्ही फळांचा आहार करू शकता.
तळलेले, जड अन्न खाऊ नये –
उपवासाच्या दिवशी तळलेले किंवा जड अन्न पदार्थ खावेत. या पदार्थांमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
हेही पाहा –