Saturday, February 8, 2025
HomeमानिनीParenting Tips : मुले अपशब्द वापरतात? असे समजवा

Parenting Tips : मुले अपशब्द वापरतात? असे समजवा

Subscribe

मुलांचे संगोपन करताना अनेक पालकांची तारेवरची कसरत होते. पालकत्व करताना पालकांमध्ये धैर्य आणि संयम असणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलांना शिस्त लावताना स्वत: शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. कारण मुले पालकांचे अनुकरण करतात. यासह सभोवतालच्या वातावरणाचाही मुलांवर परिणाम होत असतो. जर मुलं चांगल्या वातावरणात वाढले तर ते सुस्कृंत होतात आणि आजुबाजूचे वातावरण वाईट असेल तर मुलं चुकीच्या गोष्टी लवकर शिकतात. काही वेळा पाहून, ऐकून मुलं अपशब्द वापरण्यास सुरुवात करतात. मुलांनी अपशब्द वापरले की, आई-वडीलांची डोकेदुखी वाढते. जर तुमचे मूल देखील गैरवर्तन करायला शिकले असेल तर तुम्हाला याची काळजी वाटेल, हा लेख तुमच्यासाठी.

  • मुलांनी अपशब्द वापरल्यास पालकांचा संयम सुटतो. काहीवेळा पालंकाकडून मुलांवर हात उगारला जातो. पण, पालकांचे हे वागणे मुलांचे वागणं आणखी बिघडवू शकते. अशावेळी पालकांनी मुलांना अतिशय शांतपणे समजावून सांगायला हवे. असे शब्द वापरणे का चुकीचे आहे हे सांगावे.
  • मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या शब्दांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही जर घरात शिवीगाळ करत असाल तर मुलं तुमचे अनुकरण करणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुलांसमोर अपशब्द वापरू नये.

  • पालकत्व करताना मुलांना वेळोवेळी गोष्टी समजावून सांगणे महत्वाचे असते. मुलांना चांगल्या – वाईट शब्दांचे आणि वागण्याचे फायदे तोटे सांगावेत. जेणेकरून मुले चुकीचे वागणार नाही.
  • तुम्ही समजल्यावर मुले सुधारत असतील तर त्यांची प्रशंसा करावी. मुलांची केलेली प्रशंसा मुलांचा उत्साह वाढवतो आणि मुले चुकीचे वागत नाही.
  • मुलांना संस्कार घडविण्यात घरातील वातावरण फार महत्वाची भूमिका बजावते. मुले वाढताना घरातील वातावरण आनंदी असायला हवे, पालकांनी मुलांसमोर वाद घालू नये. याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini