Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHow to Stop overthinking : ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण कसे मिळवाल?

How to Stop overthinking : ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण कसे मिळवाल?

Subscribe

कोणतेही काम विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. पण, एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणे मानसिक स्वास्थासह शारीरिक स्वास्थासाठी घातक ठरणारे असते. काहीना भूतकाळात घडलेल्या घटनेचा किंवा जी गोष्ट घडलीच नाही त्याबद्दल जास्त विचार करायची सवय असते, ज्याला ओव्हरथिंकिग असे म्हटले जाते. ओव्हरथिंकिंगमुळे व्यक्तीच्या डोक्यात सतत विचांराचे चक्र सुरू असते. यामुळे स्ट्रेस, टेंशन अशा समस्या सुरू होतात. तुम्हीही ओव्हरथिंकिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी पूर्ण वाचा. आज आम्ही तुम्हाला ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण कसे मिळवायचे याबद्दल सांगणार आहोत,

  • ओव्हरथिंकिग टाळण्यासाठी मेडीटेशनचा सराव करावा. मेडीटेशनमुळे मनातील भिती कमी होते आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल.
  • तुमच्या हातून काही चुकिचे झाले असेल तर त्याचा सतत विचार करू नये. स्वत:ला माफ करा आणि पुढे जायला शिका. फक्त ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • चहा प्यावा. पण, दुधाचा नाही तर कॅमोमाइल चहा प्यायला हवा. कॅमोमाइल चहामध्ये तणावविरोधी गुणधर्म असतात,ज्यामुळे मन शांत होण्यास मदत होते.
  • अश्वगंधा तणाव कमी करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे ओव्हरथिंकिंगमुळे झोप येत नसेल तर अश्वगंधाची गोळी घ्यावी. या गोळीमुळे मानसिक ताण कमी होतो आणि रात्री शांत झोप लागते.
  • एकटं राहू नका. मनातील सल कुटूंबियांशी, मित्र-मैत्रिणीशी शेअर करा. याने ओव्हरथिंकिपासून सुटका होईल.
  • ओव्हरथिंकिंगमुळे निर्माण होणारा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता.
  • जास्तीत जास्त सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. सकारात्मक वातावरणात राहिल्याने ताणतणाव तुमच्यापासून दुर राहिल.
  • तुम्ही डार्क चॉकलेटही खाऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनाइड्स असतात, जे मेंदूच्या क्रियांना चालना देणारी केमिकल्स नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे जेव्हाही ओव्हरथिंकिंग होईल असे वाटेल तेव्हा डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरेल.
  • तुम्ही अक्रोड देखील खाऊ शकता. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, अॅटी-ऑक्सिडंट असतात, जे मन शांत ठेवतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही अक्रोड खाल तेव्हा तुमचा मानसिक थकवा कमी होण्यास मदत होते.
  • शेवटी एक लक्षात घ्या, ओव्हरथिंकिंगच्या समस्येतून तुम्ही स्वत:चं स्वत:ला बाहेर काढू शकता.

या गोष्टी महत्वाच्या –

  • झोपण्याच्या 15 ते 20 मिनिटे आधी माइंडफूलनेस मेडिटेशन करणे फायद्याचे ठरेल.
  • सकाळी उठल्यावर 10 ते 12 मिनिटे दिर्घ श्वास घ्या.
  • दररोज एकतरी अॅक्टीव्हिटी करा.

 

- Advertisement -

 

हेही पाहा –

- Advertisement -


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini