मांसाहारी पदार्थ असो वा शाकाहारी पदार्थ खोबऱ्याचा वापर केला जातो. त्यात तुम्ही जर कोकणी असाल तर तुमच्या जेवणात दररोज खोबरं हे असेलच. कोकणी कुटूंबाचे जेवण खोबऱ्याशिवाय अपूर्णच असते. त्यामुळे बऱ्याच गृहीणी घरात सुकं खोबरं साठवून ठेवतात. पण, अनेकदा सुकं खोबरं काळ पडते आणि चवीला खवट लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्षभर खोबरं कसं फ्रेश ठेवायचे याबद्दल सांगणार आहोत. या टिप्समुळे खोबरं खराब होणार नाही आणि त्यातील पोषक घटक कमी होणार नाहीत.
उत्तम दर्जाचा नारळ निवडावा –
वर्षभर खोबंर टिकवण्यासाठी योग्य नारळाची निवड अवश्य आहे, कारण खराब नारळ जर तुम्ही घेतलात आणि त्याचे खोबरं टिकवायच्या विचारात असाल तर खराब होऊ शकते. टिकाऊ नारळ बघताना त्याच्या शेंड्या चेक कराव्यात.
कोरडी जागा –
जास्त वेळ खोबरं टिकवायचं असेल तर ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. खोबरं किसल्यानंतर पूर्णपणे कोरडे करून घ्यावे, थोडा जरी ओलावा खोबऱ्याला जाणवल्यास खराब होऊ शकतो. आता तुम्हाला ओला नारळ सुकवायचा असेल तर उन्हात तुम्ही वाळवू शकता.
हवाबंद कटेंनर –
सुकं खोबरं जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी हवाबंद कंटेनरचा वापर करणे फायदेशीर ठरते. हवाबंद कंटेनरमध्ये खोबऱ्याचे आर्द्रता, हवेपासून संरक्षण होते. यासाठी कंटेनर पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा करून घ्यावा, जेणेकरून ओलावा, बॅक्टेरिया आत शिरणार नाहीत.
किसून ठेवा –
सर्व साधारणपणे खोबऱ्याचे तुकडे करून ठेवले जातात, पण त्याऐवजी तुम्ही नारळ किसून ठेवू शकता. किसलेले खोबरेही वर्षभर सहजपणे टिकते.
पिशवीत ठेवू शकता –
खोबरे एका पिशवीत बांधून हवाबंद डब्यात ठेवले तर ते फ्रेश राहते. फक्त त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. डब्यात खोबरं ठेवण्यापूर्वी कागदावर पसरवून घ्यावे. एका वाटीत मीठाचे पाणी घ्या. यानंतर एक कापड घेऊन मीठाच्या बूडवावे आणि खोबऱ्याची वाटी पुसून घ्यावी. यानंतर खोबरे सुकवावे आणि मग साठवावे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde