Friday, January 24, 2025
HomeमानिनीWinter Health : थंड पाण्याने आंघोळ करण्याची योग्य पद्धत

Winter Health : थंड पाण्याने आंघोळ करण्याची योग्य पद्धत

Subscribe

थंडीच्या दिवसात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक असते. आपण अनेकदा ऐकले असेल की, बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला. पण, बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारण काय असेल? हा कधी विचार केलात का? खरं तर, यामागे आंघोळ करण्याची चुकीची पद्धत हे कारण असू शकते. थंडीच्या दिवसात आंघोळ करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती समजून घ्यायला हवी.

डोक्यावर पाणी टाकू नये –

खूप जणांना अशी सवय असते की, आंघोळ करताना सर्वात आधी डोक्यावर पाणी ओतायचे. पण, तुमची ही सवय जीवघेणी ठरू शकते. डोक्यावर पाणी टाकल्याने हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो.

अशी करावी आंघोळ –

  • पाणी थंड असो वा गरम थंडीच्या दिवसात थेट डोक्यावर घेऊ नये.
  • आंघोळ करताना आधी पायावर पाणी टाकावे.
  • यानंतर पोटावर आणि छातीवर पाणी टाकून चोळावे.
  • सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे.
  • तज्ञांच्या मते, या पद्धतीने अंघोळ केल्यास शरीरात एक प्रकारचा थर्मोस्टॅट तयार होतो, जो शरीराचे तापमान सामान्य ठेवतो.

या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी –

  • ज्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

  • थंडीत हात पाय दुखणे, थकवा, छातीत दुखणे यासारख्या समस्या अधिक जाणवतात. त्यामुळे हृदयविकारचा धोका आणखीनच वाढतो.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini