Sunday, April 21, 2024
घरमानिनीउन्हाळ्यात पेट्सची काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात पेट्सची काळजी कशी घ्याल?

Subscribe

आपल्याकडे पेट्स लव्हर्सची काही कमी नाहीये. पेट्सचा सांभाळ करण्यासोबत त्यांची योग्य रित्या काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. विशेष करून उन्हाळयाच्या दिवसात. कडाक्याच्या उन्हात जसे आपल्याला उष्माघात, डिहायड्रेशन यासारखे समस्या जाणवतात त्याच समस्या प्राण्यांनाही जाणवत असतात. त्यामुळेच प्राण्यांची उन्हाळयाच्या दिवसात  योग्यरीत्या काळजी घेणे गरजेचे असते. खरं तर, प्राण्यांच्या शरीराचे सामान्य तापमान मानवापेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे त्यांना जास्त हिट जाणवते शिवाय त्यांच्या अंगावर केस सुद्धा असतात.

पेट्सची काळजी अशी घ्या –

- Advertisement -

पेट्सच्या आहाराकडे लक्ष द्या –
उन्हाळयात पेट्सना असे पदार्थ खायला द्या ज्याने त्यांना थंडावा जाणवेल. तुम्ही त्यांना फळे सुद्धा देऊ शकता. यात टरबूज, द्राक्षे, केळी तुम्ही देऊ शकता. पण, देताना प्रमाणाकडे लक्ष द्या. तसेच उन्हाळ्यात चिकन आणि मटण यासारख्ये मांसाहारी पदार्थ खायला देऊ नका कारण या पदार्थानी उष्णता अधिक वाढते.

वेळोवेळी अंघोळ घालायला विसरू नका –
अंघोळीने जसे आपल्याला फ्रेश वाटते तसेच प्राण्यांनाही वाटते. अंघोळ घालण्याने पेट्सच्या शरीराला थंडावा तर जाणवेलच याशिवाय त्यांच्या शरीरातील घाणही निघून जाईल. त्यांना नियमित अंघोळ घातल्याने पेट्सला होणारे त्वचेचे संक्रमण टाळता येते.

- Advertisement -

रोगांपासून संरक्षण करा –
उन्हाळ्याच्या कडाक्यात टीका आणि पिसू सारखे कीटक प्राण्यांना त्रास देऊ लागतात. यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने टिक्स स्प्रे वापरू शकता. याशिवाय टिक्स आणि पिसूपासून संरक्षण मिळविण्यासाठी औषधे देखील उपलब्ध आहेत.

जास्त वेळ उन्हात घेऊन जाऊ नका –
पेट्सला नेहमी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर बाहेर फिरवा. यामुळे उष्माघातापासून त्यांचे रक्षण होईल. उन्हाच्या दिवसात त्यांना जास्त लांब फिरायला नेवू नका. जायचेच असेल तर पाणी अवश्य सोबत ठेवा.

हायड्रेशन –
उन्हाळ्यात मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही जास्त तहान लागते. अशा परिस्थितीत घरात त्यांच्यासाठी नेहमी फ्रेश पाणी ठेवा. वेळोवेळी ते तपासात राहा. त्यात काही घाण साचली असेल तर ते बदलत राहा. याशिवाय तुम्ही त्यांना आईस्क्रीमही देऊ शकता. फक्त देताना त्याचे प्रमाण लक्षात घ्या.

 

 


हेही वाचा : लिफ्टमध्ये अडकलात, करा ‘हे’ काम

- Advertisment -

Manini