अन्न ताजे आणि दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करण्यात येतो. उन्हाळ्यात फ्रीजचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि या दिवसात त्याची देखभाल व्यवस्थित केली जाते. याउलट हिवाळ्यात फ्रीजचा वापर तुलनेने कमी होतो आणि देखभालीच्याबाबतीत निष्काळजीपणा करण्यात येतो. ज्यामुळे फ्रीजच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला फ्रीज दिर्घकाळ टिकवायचा असेल तर थंड वातावरणात त्याची योग्यरित्या देखभाल करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फ्रीजची व्यवस्थित काळजी घेतल्यास त्याचे आयुर्मान वाढते आणि विजेचा खर्चही कमी होतो. त्यामुळे जाणून घेऊयात यासंदर्भातील सोप्या टिप्स,
- थंडीपासून बचाव होण्यासाठी आणि घर उबदार राहण्यासाठी रुम हिटरचा वापर करण्यात येतो. पण, रूम हिटर आणि फ्रीज जवळ ठेवणे जोखमीचे ठरू शकते.
- हिटरमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे फ्रीजच्या कंप्रेसरचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे फ्रीज खराब होऊ शकते.
थंडी असो वा कोणताही ऋतू वेळोवेळी फ्रीजची साफसफाई होणे आवश्यक आहे. - फ्रीज खराब होण्याचे आणखी एक कारण म्हणजे फ्रीजमध्ये खराब आणि शिळे अन्न ठेवणे. या गोष्टींमुळे फ्रीज खराब होऊ शकतो.
- फ्रीज भिंतीला चिकटून ठेवू नयेत. खरं तर, हिवाळ्यात फ्रीज भिंतीजवळ ठेवल्याने खोलीचे तापमान कमी होते, ज्यामुळे फ्रीडच्या आतील थंडावा बाहेर येत नाही. अश्याने कॉम्प्रेसरवर दाब येतो. ज्यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो.
- हिवाळ्यात पदार्थ लवकर खराब होत नसल्याने फ्रीजमध्ये अनेक गोष्टी ठेवणे टाळले जातात. काही वेळा तर फ्रीज बंद ठेवण्यात येतो. पण, वारंवार असे केल्याने फ्रीजमधून गॅसगळती होऊ शकते.
तापमान किती ठेवाल –
वातावरणातील गारव्यामुळे फ्रीजचे तापमान किती असावे , असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तुम्ही या दिवसात फ्रीजचे तापमान 2 डिग्री सेल्सियस ते 5 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवणे उत्तम मानले जाते. 2 डिग्री सेल्सियस ते 5 डिग्री सेल्सियस तापमान पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी पुरेस थंड असते.
हेही पाहा –