Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यात घ्या लहान बाळांची 'अशी' काळजी

हिवाळ्यात घ्या लहान बाळांची ‘अशी’ काळजी

Subscribe

थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुले सर्दी, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारांना सहज बळी पडू शकतात. सर्दी आणि खोकल्याचा परिणाम काही विशिष्ट प्रकारच्या ॲलर्जीमुळे मुलांमध्ये दीर्घकाळ दिसून येतो. तसेच आता हिवाळा सुरू झाला असून, थंडी पडायला लागली आहे. या दिवसांत प्रत्येक आईसाठी सर्वांत मोठी चिंता असते ती म्हणजे आपल्या मुलांना उबदार कसे ठेवता येईल. आणि त्यांची थंडीमध्ये कशी काळजी घेता येईल याकडे पालकांचे लक्ष जास्त असते. अशातच लहान बाळांसाठी काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहील आणि हिवाळ्यात बाळाला थंडी पासून संरक्षण मिळेल.

How is Child Support Calculated in Texas? - Texas Divorce Laws

 • थंडीच्या दिवसात नवजात आणि लहान चांगले उबदार कपडे घातले पाहिजे.
 • तसेच थंडीत त्यांना कमी कपडे किंवा जास्त पण कपडे घालू नये. बाळाला अडचण होईल असे कपडे टाळणे.
 • नेहमीपेक्षा एक किंवा दोन कपडे बाळाला उबदार आणि आरामदायक ठेवण्यासाठी घाला. जास्त कपडे घालू नका.
 • महत्वाचे म्हणजे बाळाची खोली ही आरामदायक असावी. तसेच त्या खोलीत उबदारपणा आणि योग्य प्रमाणात खेळती हवा असावी.
 • बाहेरच्या हवेपासून बाळांना लांब ठेवा. थंड हवा त्यांच्या आरोग्याला चांगली नाही.
 • बाळाला त्याच्या आकारानुसार उबदार ब्लँकेट किंवा लहान स्लीपिंग बॅगमध्ये गुंडाळणे ही चांगली सवय आहे.
 • अशाने रात्रभर त्यांना उबदार वाटेल. कारण, लहान मुलं बहुतेकदा ब्लँकेट किंवा चादर काढून टाकतात.
 • तसेच मोठ्या मुलांना देखील ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळणे आवश्यक आहे. जेणेकरून ते रात्रभर नीट झोपतील.
 • बाळाचे डोकं तसेच हात झाकून ठेवा. तसेच बाळाचे अंग उबदार आहे का हे तपासत रहा.
 • हिवाळ्यात अंथरूण उबदार घाला. जेणेकरून शांत झोप लागेल. जास्त थंडी लागणार नाही.
 • रात्री झोपण्यापूर्वी बाळाचे पोट रिकामी ठेऊ नका. कोमट दूध आणि पाणी बाळाला देत राहा.

हेही वाचा : थंड दूध पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

- Advertisment -

Manini