फळे आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. शरीराला आवश्यक असणारी प्रोटिन, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषकतत्वे फळांमध्ये असल्याने फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण, तुम्हाला हे माहित आहे का? फळांप्रमाणेच फळांच्या सालीमध्येही अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे फळांप्रमाणेच फळांच्या सालीदेखील आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जातात. साधारणपणे, फळे खाल्ल्यावर साली आपण फेकून देतो. पण, या साली फेकून देता आपण त्याचा वापर अनेक प्रकारे करू शकतो. फळांच्या सालीमध्ये डाळींबाची साल बहुगुणी आहे. आयुर्वेदात डाळिंबाची साल अनेक आजारांवर उपाय सांगण्यात आली आहे. जाणून घेऊयात, डाळिंबाच्या सालीचा वापर कसा करायचा,
डाळिंबाच्या सालांची चटणी –
साहित्य –
वाळलेल्या डाळिंबाच्या साली, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, जिरे पावडर आणि मीठ
कृती –
- आता चटणी बनवण्यासाठी वाळलेली डाळिंबाच्या साली हलक्या तळून घ्याव्यात, जेणेकरून त्यांचा कडूपणा कमी होईल.
- यानंतर मिक्सरमध्ये सोललेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, धणेपूड, जिरेपूड घालावी.
- यात आता थोडे पाणी घालून मिश्रण बारीक करावे.
- सर्वात शेवटी लिंबाचा रस घाला.
- तुमची डाळिंबाच्या सालीची चटणी घालावी.
डाळिंबाच्या सालीचा चहा –
साहित्य –
वाळलेल्या डाळिंबाच्या साली , पाणी, मध, दालचिनी पावडर, लिंबाचा रस
कृती –
- सर्वात आधी डाळिंबाचे साले नीट धुवा आणि उन्हात वाळवा.
- यानंतर एका पॅनमध्ये 2 कप पाणी घ्यावे आणि त्यात वाळलेल्या साली घाला.
- मध्यम आचेवर 5 मिनिटे उकळवा.
- यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या.
- यात आता मध आणि लिंबाचा रस मिक्स करावा.
- तुमचा स्पेशल चहा तयार झाला आहे. या चहाने पचन सुधारण्यास मदत होईल आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.
डाळिंबाच्या सालीची पावडर –
साहित्य –
वाळलेल्या डाळिंबाच्या साली, बडीशेप, काळी मिरी, दालचिनी पावडर, काळे मीठ
कृती –
- डाळिंबाची साले वाळवून मंद आचेवर भाजून घ्यावीत.
- त्यांना मिक्सरमध्ये बडीशेप, काळी मिरी, दालचिनी बारीक करून घ्यावे.
- तयार पावडर हवाबंद डब्यात ठेवा.
हेही पाहा –