वाढलेल्या वजनाची समस्या हल्ली बऱ्याच जणांची डोकेदुखी ठरत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती लाइफस्टाइल अशी अनेक कारणे वाढत्या वजनाला कारणीभूत ठरत आहेत. परिणामी, वाढत्या वजनाच्या समस्येमुळे रक्तदाब, डायबिटीस अशा आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी कोणी जिम करतंय तर कोणी योगा. पण, अनेकदा खूप प्रयन्त करूनही वजन काही कमी होत नाही. अशावेळी तुम्हाला वेट लॉससाठी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतील.
हिंदू शास्त्रात, तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्टा महत्त्वाचे नसून आरोग्याच्या तक्रारीसाठी उपयुक्त ठरते. याचप्रमाणे वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही तुळशीच्या बिया फायदेशीर असतात. तुळशीच्या बियांमध्ये फायबर, फॅटी ऍसिड, ऍटी-बॅक्टेरीअल आणि ओमेगा ३ असतात, जे वेट लॉससाठी फायदेशीर मानले जातात. याव्यतिरीक्त तुळशीच्या बियांमधील अल्फा-लिनोलेनिक ऍसिड फॅट बर्न करण्यासाठी मदत करतात.
तुळशीच्या बियांचे सेवन कसे करावे –
पहिली पद्धत –
- वेट लॉससाठी तुळशीच्या बियांचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्यावे.
- यानंतर यात एक चमचा तुळशीच्या बिया टाका.
- रात्रभर हे पाणी तसेच असू द्या.
- सकाळी तयार पाणी गाळून प्यावे.
दुसरी पद्धत –
- एका भांड्यात 2 ते 3 कप पाणी गरम करण्यास ठेवावे.
- या पाण्यात 4 ते 5 तुळशीची पाने टाकावीत.
- पाण्यात एक उकळी आणावी.
- पाण्यात एक चमचा मध टाकावे.
- तयार पाणी गाळून प्यावे.
तिसरी पद्धत –
- तुम्ही तुळशीच्या बियांचा चहा सुद्धा पिऊ शकता.
- तुळशीच्या चहाने वजन झपाट्याने कमी होते.
चौथी पद्धत –
- वाढते वजन कमी करण्यासाठी तुळस आणि लिंबू उपयुक्त ठरते.
- यासाठी तुम्हाला तुळशीचा काढा प्यावा लागेल.
- यानंतर तुळस आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यावा.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde