आपला चेहरा स्वच्छ, सुंदर, नितळ दिसावा असे प्रत्येकाला वाटते. चेहऱ्याचा रंग उजळ व्हावा यासाठी महिला विविध मेकअप प्रॉडक्ट वापरतात. ज्यामुळे तात्पुरता चेहऱ्याचा रंग उजळतो पण, काहीवेळा या मेकअप प्रॉडक्टमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते. अशावेळी तुम्ही स्वच्छ, सुंदर, नितळ त्वचेसाठी बाजारातील मेकअप प्रॉडक्टपेक्षा घरगुती उपाय करायला हवेत. घरगुती उपायांमध्ये दह्याचा वापर करणे फायद्याचे ठरेल. चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड असलेले दही त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि सनबर्न सारख्या समस्या दूर करण्यासाठी दह्याचा वापर करणे उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात दही चेहऱ्यासाठी कसे वापरावे,
दही चेहऱ्यासाठी नियमित वापरल्याने चेहऱ्याच्या विविध तक्रारी कमी होतात. तुम्ही स्वच्छ, सुंदर, नितळ त्वचेसाठी दह्याचे फेसपॅक बनवू शकता.
फेसपॅक –
साहित्य –
- दही – 2 चमचे
- मध – 1 चमचा
- ओट्स – 1 चमचा
कृती –
- हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात रात्रभर ओट्स भिजवावे लागतील.
- दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
- तयार पेस्टमध्ये दही, मध मिक्स करावे.
- यानंतर पेस्टमध्ये गुलाबपाणी मिक्स करा.
- तयार फेसपॅक 15 ते 20 मिनिटे तसाच झाकून ठेवा.
- यानंतर चेहरा स्वच्छ करा.
- तयार पेस्ट ब्रशच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावून घ्यावी.
- 10 मिनिटे चेहऱ्यावर फेसपॅक तसाच असू द्या.
- हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करावी.
- नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
- या फेसपॅकमुळे मध त्वचा उजळण्यास, मऊ होण्यास आणि चमकदार होण्यास मदत होते.
या गोष्टी लक्षात घ्या –
- चेहऱ्यावर दह्याचा फेसपॅक लावण्याआधी एकदा पॅच टेस्ट करावी.
- दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर अशा त्वचेसाठी दह्याचा वापर करताना काळजी घ्यावी.
- आठवड्यातून केवळ एकदाच हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.
हेही पाहा –