हल्ली बाजारात विविध रंगाचे, डिझाइन्सचे रेडिमेड ब्लाउज मिळतात. रेडिमेड ब्लाउजमुळे शिलाईचे पैसे वाचतात आणि महिलांचा बाजारात जाण्याचा वेळही वाचतो. रेडिमेड ब्लाउजचे वैशिष्ट सांगायचे झाल्यास गरजेनुसार त्यातील पॅड बाजूला काढता येतात आणि पुन्हा वापरता येतात. पॅडेड ब्लाउजमुळे ब्रेस्टचा शेप व्यवस्थित दिसतो. त्यामुळे हल्ली महिला पॅडेड ब्लाउज वापरण्याला अधिक प्राधान्य देतात. पण, पॅडेड ब्लाउज धुवायचे कसे असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. चला तर मग जाणून घेऊयात, पॅडेड ब्लाउज धुण्याची योग्य पद्धत. या पद्धतीने ब्लाउज धुतल्यास पॅड खराब होत नाहीत आणि कपड्यांची चमक तशीच राहते.
- कपडे गरम पाण्यात कपडे धुतल्याने स्वच्छ होतात, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. खरं तर, काही कपड्यांच्या बाबतीत हा उपाय फायदेशीर ठरतो. पण, पॅडेड ब्लाउजच्या बाबतीत लागू होत नाही.
- पॅडेड ब्लाउज चुकूनही गरम पाण्यात धुवू नये. पॅडेड ब्लाउज गरम पाण्यात धुतल्याने पॅड खराब होतात. असे ब्लाउज धुण्यासाठी नॉर्मल किंवा हलके कोमट पाणी वापरावे.
- ब्लाउज धुतल्यानंतर सुकविण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करू नये. वॉशिंग मशीनमध्ये ब्लाउज सुकविल्याने पॅडचा शेप खराब होतो. त्यामुळे चुकूनही असे करू नये. त्याऐवजी ब्लाउजमधील पाणी काढून टाकण्यासाठी टॉवेलमध्ये ब्लाउज ठेवावा.
- वॉशिंग मशीनमध्ये ब्लाउज धुवू नये. पॅडेड ब्लाउज हलक्या हाताने धुवावेत. ब्रशने घासू नये. जोरजोरात ब्रशने घासल्यास ब्लाउजवरील डिझाइन खराब होते आणि पॅड खराब होतात.
- जर पॅडेड ब्लाउजला हट्टी डाग लागले असतील तर काढण्यासाठी लिक्विडचा वापर करता येईल. यासाठी पाण्यात थोडे लिक्वीड टाकून त्या पाण्याने ब्लाउज हलक्या हाताने धुवा. या टिप्समुळे पॅड खराब होणार नाही.
- पॅडेड ब्लाउज कडक उन्हात सुकवू नयेत, त्याऐवजी हलक्या सूर्यप्रकाशात सुकवावेत. या टिपमुळे ब्लाउजचा रंग जाणार नाही.
- पॅडेड ब्लाउज सुकल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करुन ठेवावेत. फोल्ड करताना पॅड फोल्ड होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हेही पाहा –