Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Happy Hug Day 2021: मिठी मारल्यानं नात्यासह आरोग्यही राहतं फीट! जाणून घ्या...

Happy Hug Day 2021: मिठी मारल्यानं नात्यासह आरोग्यही राहतं फीट! जाणून घ्या फायदे

जाणून घ्या आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारण्याचे काही फायदे

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन तीन दिवसांपूर्वीपासून प्रेमाचा आठवडा सुरू झालाय. तरूणाईमध्ये उत्साहाचं वातावरण असून आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष काही दिवस फेब्रवारीमहिन्यात असतात. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या आधी साजरा होणारा दिवस म्हणजे हग डे (Hug Day). हा दिवस आज तरूणाईकडून साजरा केला जातोय. आपल्या जोडीदारास हग म्हणजेच मिठी मारण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? ज्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करणे शक्य नसते. त्या भावना एका मिठीतील प्रेमाद्वारे उत्कटतेने व्यक्त केल्या जाऊ शकतात. या हग डेनिमित्त आपल्या जोडीदारासह आपल्या आईवडिलांना, भावांना, बहिणींना, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकतात, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावनाच नाही तर ते आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहेत.

जाणून घ्या आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारण्याचे काही फायदे
  • एका अहवालानुसार असे समोर आले आहे की, मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन्स ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढते. हे हार्मोन्स हृदयासाठी फार फायदेशीर असतात.
  • असे सांगितले जाते की, मिठी मारल्याने ब्लड प्रेशर कमी होतं. हे शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन्स रिलीज झाल्याने होत असतं. ५९ लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार असे समोर आले आहे की, जे लोक नेहमी आपल्या पार्टनरला मिठी मारतात, त्याचं ब्लड प्रेशर नेहमीच कंट्रोलमध्ये राहते.
  • आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. यासह प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने ताण-तणाव तर कमी होतोच यासह त्या व्यक्तीची स्मरणशक्तीही वाढते.
  • साधारण ४०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, असे समोर आले आहे की, मिठी मारल्याने त्या व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता कमी होते. ज्या लोकांना आपल्या पार्टनरचा सपोर्ट नेहमी मिळतो त्या लोकांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो.
  • आपल्या प्रिय व्यक्तीना मिठी मारल्याने व्यक्तीचा मूड फ्रेश होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारता तेव्हा मेंदूत सेरोटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होतात. ज्यामुळे तुमचा मूड फ्रेश राहतो. मिठी मारल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमता देखील अधिक वाढते असे देखील वैज्ञानिकांच्या निरीक्षणातून समोर आले आहे.
- Advertisement -